सुरेखा हजारे ( हराळे) यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंत पुरस्काराने गौरवण्यात आले

सुरेखा हजारे ( हराळे) यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंत पुरस्काराने गौरवण्यात आले

सुरेखा हजारे ( हराळे) यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल यशवंत पुरस्काराने गौरवण्यात आले

सांगली प्रतिनिधी अशोक मासाळ 

खंडेराजुरी येथील सुरेखा हजारे हराळे यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉक्टर अशोक माळी फाउंडेशनच्या वतीने यशवंत हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शिक्षिका सुरेखा हराळे हजारे यांनी इमान वस्ती हनुमान नगर खंडेराजुरी शाळेत गेली 21 वर्षे उत्कृष्ट गुणवत्ता शालेय पटसंख्या क्रीडाक्षेत्र शाळा सजावट शैक्षणिक उठावातून अनेक कामे एक शिक्षिका असूनही या वस्ती शाळेत पूर्ण केले आहेत. वाडी वस्तीवरील दुर्लक्षित मुलांना शिक्षण मिळावे हा महाराष्ट्र शासनाचा हेतू या वस्तू शाळेची प्रगती गुणवत्ता पाहिली तर शासनाची वस्तू शाळा हा उपक्रम यशस्वी झाल्याचे दिसते. हनुमान वस्ती शाळा ही गुणवत्ता व क्रीडा इमारत मध्ये जिल्ह्यामध्ये अग्रक्रमावर आहे एक शिक्षकी शाळा असून शाळेतील पालक व हनुमान नगर मधील नागरिकांनी वस्ती शाळेसाठी दिलेले योगदानामुळे शाळा आजही अव्वल आहे त्यांनी केलेले  चौफेर शैक्षणिक कामाची दखल घेऊन डॉ. अशोक माळी फाउंडेशन ने त्यांना शिक्षण क्षेत्रातील यशवंत हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव माळी शैक्षणिक संकलनाच्या पटकन केला त्यावेळी पुढारीचे कार्यकारी संपादक श्रीराम पचिंद्रे, डॉ. अशोक माळी डॉ स्नेहलता माळी, माजी महापौर किशोर जामदार, डॉ शिरीश चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.