बिद्री कारवाईच्या निषेधार्थ, तहसिलदार भुदरगड कार्यालयावरती मोर्चा
कागल प्रतिनिधी : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता अचानक तपासणी सुरू केली, ही चौकशी शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिस्टलरी प्रकल्पाचा उत्पादन आणि विक्री हे दोन्हीही परवाने निलंबित केले आहेत. परिणामी कारखाना डिस्टिलरीकडे उपलब्ध असलेल्या रेक्टिफाईड स्पिरीटची विक्री ही थांबली आहे. याच्या निषेधार्थ, तहसिलदार भुदरगड कार्यालयावरती भव्य मोर्चा काढण्यात आला.
यावेळी हजारो शेतकरी ऊस उत्पादक सभासद रस्त्यावर उतरून शासनाचा जाहीर निषेध केले. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे नेते रामचंद्र कळंबेकर,भाजपाचे जिल्हाध्यक्ष व संचालक राहुलदादा देसाई, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई, जयवंत गोरे,सर्जेराव देसाई, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत प्रा.शेखर देसाई यांनी केले. मोर्चास बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के.पी.पाटील, प्रा.किसन चौगुले, विश्वनाथ कुंभार,शामराव देसाई, धैर्यशील पाटील,बिद्रीचे संचालक पंडीतराव केणे, मधुकर देसाई,धनाजीराव देसाई,राहुलदादा देसाई,के.ना.पाटील,सत्यजित जाधव,संदीप पाटील, यांच्यासह सर्व माजी संचालक,बाजार कमिटीचे संचालक यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.