Vidhan Parishad Election; काँग्रेसचं गणित कसं बिघडलं..!
मुंबई (प्रतिनिधी) : भाजपाच्या पाचही उमेदवारांनी विजय मिळवला.सदाभाऊ खोत यांना पहिल्या पसंतीची मतं कमी मिळाल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निवडून आले. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे असलेले प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना विजय मिळाला. मात्र, जयंत पाटील यांना अवघी १२ मतं मिळाली. शरद पवार गटाची सगळी मतं जयंत पाटील यांना मिळाली, परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीची मतं त्यांना मिळाली नाहीत.
काँग्रेसचे मतं कसं फुटली..!
काँग्रेसकडे ३७ मतं असताना प्रज्ञा सातव यांना २५ मतं मिळाली.उरलेल्या १२ मतांपैकी ५ मतं मिलिंद नार्वेकरांना मिळाली, तर ७ मतं फुटली.या फुटलेल्या मतांमुळे जयंत पाटील यांचा विजयाचं गणित बिघडलं. जयंत पाटील यांना अपेक्षित मतं न मिळणे आणि काँग्रेसच्या फुटलेल्या मतांचा परिणाम. तसेच सदाभाऊ खोत यांचा दुसऱ्या पसंतीच्या मतांवर विजय.तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या उमेदवारांचा विजय, ही या निवडणुकीतील महत्त्वाची ठरली आहेत.ही निवडणूक आणि तिच्या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात, आणि आगामी काळात या बदलांची दिशा ठरवणारी ठरू शकते.