बी आय डी एफ तर्फे गुंतवणुकीतील संधी विषयी व्याख्यान संपन्न

बी आय डी एफ तर्फे गुंतवणुकीतील संधी विषयी व्याख्यान संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : येणारा काळ हा जीडीपी वाढीसाठी महत्त्वाचा ठरेल कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरचे राजकीय स्थैर्य आणि विकसित भारतासाठी सुरू असलेले प्रयत्न महत्त्वाचे आहे. यामुळे शेअर बाजारात तेजीची शक्यता राहणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी विचार करावा असे मत मॅरेथॉन ट्रेंड्स ॲडव्हायझरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी अतुल सुरी यांनी केले.

      संजय घोडावत विद्यापीठात बी आय डी एफ तर्फे अमृत काल - गुंतवणुकीतील संधी विषयी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

     सुरी पुढे म्हणाले, 2047 पर्यंत निफ्टीचा विचार केल्यास उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार यांना यामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. भारतातील वाढत्या बाजारपेठेचा विचार केल्यास मेहनतीने आणि विचारपूर्वक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आर्थिक विकासाचा दर हा 15 किंवा 20 वर्षांनी वाढत असतो. खऱ्या अर्थाने गुंतवणुकीसाठी हा काळ अमृत काळ असतो. जागतिक बाजारपेठेचा अभ्यास केल्यास अशीच परिस्थिती दिसून येते. जीडीपी वाढ आणि स्टॉक मार्केट वाढ यांच्यामध्ये सहसंबंध असतो. ज्या देशात तरुणांची संख्या जास्त आहे, त्या देशाचा विकासदर वाढताना दिसतो. अशा परिस्थितीत सेविंग चे प्रमाण वाढलेले असल्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे असते असे मत त्यांनी मांडले.

     पुढे ते असेही म्हणाले की भारतात परदेशी गुंतवणूकदार जसे गुंतवणूक करतायेत तशाच पद्धतीने भारतातील गुंतवणूकदारांनी या गुंतवणुकीचा अभ्यास करून विविध क्षेत्रात गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे. येणारी 28 वर्षे ही भारतीय बाजारपेठेत गुंतवणूकीसाठी चांगली असणार आहेत. अमेरिका चीन या देशांचा विचार करता भारत हा तरुणांचा देश बनला आहे, त्यामुळे उत्पादनक्षमतेत सातत्य राहणार असून हा काळ अमृत काळ सर्वांसाठी असणार आहे.

          यावेळी बी आय डी एफ चे अध्यक्ष संजय घोडावत यांनी फोरम द्वारे उद्योग व्यवसाय वाढीसाठी सातत्याने नवीन उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. गुंतवणुकीमुळे आपण यशाची एक एक शिखरे पार करत पुढे जातो त्यासाठी गुंतवणुक वाढवणे गरजेचे आहे. पैसे वाढवताना मूल्यांची जपणूक करणे गरजेचे असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोहन तिवडे यांनी केले तर आभार व्यावसायिक राजू मेहता मानले यावेळी बी आय डी एफ चे सदस्य उपस्थित होते.