भीमा कृषी पशू प्रदर्शनाचे २१ ते २४ फेब्रुवारी रोजी मेरी वेदर मैदान येथे आयोजन : खा. धनंजय महाडिक

कोल्हापूर : १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी यावर्षी ही हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२०२५ मध्ये भरविण्यात आपल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण प्रदर्शनाचे खास आकर्षण हरियाणातील विधायक नावाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा रेडा आहे. देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन २१ फेब्रुवारीस महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.याचबरोबर आमदार अमल महाडिक,खासदार धैर्यशील माने आणि सर्व आमदार उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.
अशी असतील व्याख्याने (दुपारी १२ ते ४ )
- २२ फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार, प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा.
- दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.
- अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर. हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.
- २३ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय आसवले, माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर हे किफायतशीर दुग्ध व्यवसाय असा करा यावर विचार मांडणार आहेत.
- डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर.
- २४ फेब्रुवारी पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर हे ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग आणि आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ श्री. सुरेश मगदूम, सिनीअर कृषी विध्यावेता, जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगांव.आपले विचार व्यक्त करणार आहेत.
दिले जाणारे पुरस्कार
या प्रदर्शनामध्ये शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे,जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
यावेळी पत्रकार परिषदेलाप्रा. जे.पी.पाटील, डॉ. अजित शिंदे, डॉ.सुनील काटकर, सर्जेराव धनवडे, दादा,सुहास देशपांडे, अशोक सिधनेर्ले,दिलीप दळवी,सुजित चव्हाण आदी उपस्थित होते.