जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ

कोल्हापूर : जिल्हा परिषद कोल्हापूर कडील दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. स्पर्धेची सुरुवात महिला क्रिकेट खेळापासून करण्यात आली. दिनांक 14 जानेवारी, 2025 रोजी शास्त्रीनगर मैदानावर पुरुष क्रिकेट स्पर्धा  सकाळी ठिक 10.00 वाजता सुरु झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक  कार्तिकेयन. एस यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. 

पुरुष क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चार गट करण्यात  आले असून साखळी पध्दतीने सामने आयोजीत केले आहेत. आज झालेल्या सामन्यांमध्ये पहिला सामना पं.स. करवीर विरुध्द मुख्यालय अ मध्ये झाला त्यामध्ये करवीर विजयीृ झाले. दुसरा सामना मुख्यालय ब विरुध्द पं.स. राधानगरी मध्ये राधानगरी विजयी झाले. तीसरा सामना पं.स.  चंदगड विरुध्द हातकणंगले  मध्ये  पंचायत समिती हातकणंगले विजयी झाले. चौथा सामना पं.स. पन्हाळा विरुध्द शाहूवाडी मध्ये शाहूवाडी विजयी, पाचव्या सामन्यामध्ये चंदगड विरुध्द राधानगरी  मध्ये राधानगरी  विजयी, सहावा सामना पंचायत समिती शाहूवाडी विरुद्ध पंचायत समिती करवीर शाहूवाडी विजयी, तर सातवा सामना पंचायत समिती चंदगड विरुद्ध मुख्यालय ब टीम चंदगड विजयी झाले.

आज झालेल्या उदघाटना नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस. . अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी फलंदाजीचा आनंद लुटला व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी गोलंदाजी केली. उद्घाटना वेळी माधुरी परीट, प्रकल्प संचालक, पाणीपुरवठा स्वच्छता व गोळे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा हे उपस्थित होते. या पुढील सामने दिनांक  16 जानेवारी व दिनांक 21 ते 23 जानेवारी 2025 अखेर  शास्त्रीनगर मैदानावर संपन्न होणार आहेत.