HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

भाजपा सदस्यता नोंदणीचे तीन लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा : आमदार सत्यजित देशमुख

भाजपा सदस्यता नोंदणीचे तीन लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा : आमदार सत्यजित देशमुख

कोल्हापूर प्रतिनिधी : महायुतीवर असलेल्या विश्वासावरच महाराष्ट्रामध्ये जनतेने पुन्हा एकदा महायुतीकडे सत्ता सोपवण्याचे काम केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात न भूतो न भविष्यती असे यश महायुतीला मिळालेले असून भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी घर टू घर अभियान राबवावे असे आवाहन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले .

      कोल्हापूर ग्रामीण भाजपच्या सभासद नोंदणी अभियानाच्या कार्यशाळे प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते .

      अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील होते तर प्रदेश सचिव महेश जाधव प्रमुख उपस्थित होते .

     यावेळी बोलताना आमदार देशमुख पुढे म्हणाले, सभासद नोंदणी अभियान हा भाजपचा मुख्य कार्यक्रम असून येत्या 15 जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन लाखापेक्षा अधिक सभासदांची नोंदणी करणे हे आपल्या समोरचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता भारतीय जनता पार्टीच्या बूथप्रमुखापासून नेत्यांपर्यंत प्रत्येकाने आपले योगदान देणे आवश्यक आहे. गत वेळी झालेल्या सभासद नोंदणीचा इतिहास पाहता हे उद्दिष्टे आपण निश्चितच पार पाडू असा विश्वास व्यक्त केला.

        यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले गत वेळी भारतीय जनता पार्टीचे दीड लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट होते. एवढे उद्दिष्ट असतानाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लाख 75 हजार पेक्षा अधिक सभासदांची नोंदणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली होती त्यामुळे आत्ता मिळालेले तीन लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर 15 जानेवारी पर्यंत निश्चितच पार करू असा विश्वास व्यक्त केला.

      सभासद नोंदणी अभियानाचे प्रमुख शिवाजी बुवा यांनी सभासद नोंदणी करण्याची पद्धत जमलेल्या कार्यकर्त्यांना सांगितली .

     तसेच पाच जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयाने सुचवल्यानुसार भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यादिवशी घरोघरी जाऊन सभासद नोंदणी अभियान राबवेल असा विश्वास व्यक्त केला .

      यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सचिव भगवान काटे ,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, हंबीरराव पाटील, के एन पाटील,सरचिटणीस डॉ .आनंद गुरव प्रमोद कांबळे , सौ सुशीला पाटील,युवा मोर्चा प्रदेश सचिव अलकेश कांदळकर ,डॉ . सुभाष जाधव, धीरज करलकर , नामदेव पाटील ,अजित सिंह चव्हाण , अनिल देसाई ,महेश पाटील, दत्तात्रेय मेडशिंगे ( करवीर ) नामदेव चौगुले (भुदरगड ) प्रीतम कापसे संतोष तेली ( गडहिंग्लज ) अनिरुद्ध केसरकर (आजरा ) मंदार परितकर (पन्हाळा ) एकनाथ पाटील (कागल ) स्वप्नील शिंदे ( गगनबावडा )अनिल पंढरे (दक्षिण कोल्हापूर )आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    स्वागत व प्रस्ताविक शिवाजी बुवा यांनी केले तर आभार महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा अनिता चौगुले यांनी मानले .

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.