HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम पूर्ण होवून लवकरच १०० ई - बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम पूर्ण होवून लवकरच १०० ई - बसेस केएमटीच्या ताफ्यात दाखल होतील, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर प्रतिनिधी:  शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी आज महापालिका प्रशासनासोबत बैठक घेतली. शहराच्या दळणवळणाला गती देणार्‍या १०० ई - बसेस केएमटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी १२ पैकी ११ टाक्या बांधण्यात आल्या असून, क्रॉस कनेक्शन जोडून लवकरच संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होईल, अशी माहितीही खासदार महाडिक यांनी दिली.

कोल्हापूर महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यासाठी, खासदार धनंजय महाडिक यांनी प्रशासक के. मंजुलक्ष्मी आणि अधिकार्‍यांसोबत आज बैठक घेतली. बैठकीला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, नगररचना विभागाचे रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, रूपाराणी निकम, अजित ठाणेकर, किरण नकाते, माधुरी नकाते, मनिषा कुंभार, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे उपस्थित होते. केंद्र शासनाकडून शंभर ई बसेस मंजूर आहेत. चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाची कामे पुर्ण झाल्यानंतर, या बसेस केएमटीच्या ताफ्यात येणार आहेत. ही कामे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. दिल्लीत ५०० ई-बसेस पडून आहेत. त्यातील १०० बसेस लवकर कोल्हापुरात दाखल व्हाव्यात, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा गतीने निर्माण कराव्यात, असे आदेश खासदार महाडिक यांनी दिले. शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीतून जाणार्‍या डीपी रस्त्याचे काम २०१६ सालापासून प्रलंबित आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात आली हे गृहीत धरून, महापालिकेने बांधकाम परवानगी दिलीय, असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून, तो जिल्हाधिकार्‍यांना पाठवावा. त्यानंतर तो ८ दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला पाहीजे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. शंभर कोटी अनुदानातून मंजूर रस्ते कधी पूर्ण होणार, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. मार्च अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील, असे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. हे रस्ते दर्जेदार आणि चांगले झाले पाहीजेत, अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली. पाणी पुरवठयाचा घोळही मोठया प्रमाणात सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी येत नाही, अशी तक्रार प्रा. जयंत पाटील यांनी केली. तर वारंवार पाणी पुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. याबाबत जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी खुलासा केला. कोल्हापुरात शहरात बारा टाक्यांपैकी नवीन अकरा टाक्यांचे काम पूर्ण आहे. पाच टाक्यांची चाचणी झाली आहे. त्यापैकी तीन टाक्या लवकरच सुरू होतील, असे जलअभियंत्यांनी सांगितले. अमृत १ योजनेतून ड्रेनेज आणि शहरात तीन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहेत. अमृत २ मधून उपनगरात २४३ किलोमीटरची ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. जुनी ड्रेनेज योजना कालबाहय झाल्याने, ती बदलणे गरजेचे असल्याचे आर.के.पाटील यांनी संागितले. त्यावर ड्रेनेज बाबतचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करू, असे खासदार महाडिक यांनी नमुद केले. सावित्रीबाई फुले रूग्णालयाच्या इमारत बांधकामाची माहिती त्यांनी घेतली. ११५ बेडच्या इमारत बांधकामासाठी ४५ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. दरम्यान या ठिकाणी जादा बेडचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. आरोग्य, बांधकाम विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. त्यासाठी ठोक मानधनावर भरती करता येईल का, अशी विचारणा प्रा. जयंत पाटील यांनी केली. जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेला शाळा आणि दवाखान्यांसाठी निधी मिळतो. तसाच निधी महापालिकेलाही मिळावा, अशी अपेक्षा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली. निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिले. शहरातील अतिक्रमण वाढत आहेत, महाद्वार, ताराबाई रोड, जोतिबा रोड या ठिकाणी परप्रांतीय फेरिवाल्यांनी ठिय्या मांडलाय. ही अतिक्रमणं दूर करावीत, अशी मागणी अजित ठाणेकर यांनी केली. कोल्हापूर शहरातील मैदाने विकसित करण्याबरोबर छोटया छोटया जागा विकसित कराव्यात. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य आणि केंद्र शासनाकडे पाठवावा, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. तलाव संवर्धनाबाबतही चर्चा झाली. कोटीतिर्थ तलावाच्या विकासासाठीचा प्रस्ताव देण्याची सूचना महाडिक यांनी प्रशासनाला केल्या. कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठया प्रमाणात वाढलीय. त्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा लागेल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर शहरात तावडे हॉटेल पासून शिवाजी पुलापर्यंत तसेच त्याला जोडणारे ७ उड्डाण पुल उभारण्यासाठी आमदार अमल महाडिक यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत प्रयत्न केले आहेत. आता त्याला गती येईल, असे खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले. महायुतीच्यावतीने कोल्हापूर जिल्हयात विकासाची गंगा आणली जाईल अशी ग्वाही देतानाच, अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला. आगे आगे देखो होता है क्या, अशा शब्दात त्यांनी नेत्यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले. राजकारणात टिका ही होतच असते. मात्र काविळ झाल्यामुळे सगळे जग पिवळे दिसते, अशी स्थिती विरोधकांची झाल्याचा टोलाही महाडिक यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एप्रिलमध्ये होतील. कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार प्रभाग असतील, असे खासदार महाडिक यांनी संागितले. कोल्हापूर शहराची हद्दवाढीत ज्या गावांचा समावेश होणार आहे, त्या गावांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.