शिवसेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

कोल्हापूर प्रतिनिधी - शिवसेना महिला आघाडी आणि राजारामपुरी विभागीय शाखेच्यावतीने (ठाकरे गट) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह इतरांच्या हस्ते शिवजन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला. उद्योजक महेश उत्तुरे, विशाल देवकुळे प्रमुख उपस्थित होते.
शिवसेना उपनेते व जिल्हाप्रमुख संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महेश उत्तुरे, शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी, रविकिरण इंगवले, अनिल कदम, रघुनाथ टिपुगडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उत्तुरे व विशाल देवकुळे यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला. रिमा देशपांडे, अनिता देवकुळे, वहिदा खान यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.