महापालिका प्रशासनाचा श्रद्धांजली वाहून निषेध
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मंगळवार पेठ पोस्ट ऑफिस रोडवर मध्यवर्ती आशा वर्दळीच्या रोडवर पाच ते सहा दिवसातून कचरा ओठावाची गाडी येते, ती पण गुपचूप येते बऱ्याच वेळा घंटा किंवा शिट्टी वाजवली जात नाही. त्यामुळे अपार्टमेंटमधील नागरिकांना काहीच कळत नाही. त्याचबरोबर याच रस्त्यावर नियमित झाडलोट करण्यास व गटारी साफ करण्यास कर्मचारी कधीतरी येतात. आलेच, तर गोळा केलेला कचरा गटारीतील घाण रस्त्यावरच कडेला ठेवून जातात पुन्हा तो कचरा वाऱ्याने रस्त्यावर पसरला जातो.
याबाबत नागरिक वारंवार स्थानिक मुकादम तानाजी भोसले आरोग्य निरीक्षक नाईक मुख्य आरोग्य अधिकारी जयवंत पोवार यांच्याकडे तक्रारी करून हातबल झाले . या ठिकाणी नियमित स्वच्छता होत नाही कचरा उठाव होत नाही म्हणून प्रिन्स क्लब खासबागच्या वार्ता फलकावर महापालिकेचा निषेध म्हणून एक अभिनव मजकूर लिहिला आहे
-श्रद्धांजली -
या गल्लीतील झाडलोट व्यवस्था व कचरा उठावाची घंटागाडीचे निधन झाले आहे
महापालिका आयुक्त के मंजू लक्ष्मी यांच्या दुःखात येथील नागरिक सहभागी आहेत
शोकाकुल -मंगळवार पेठ पोस्ट ऑफिस गल्लीतील स्थानिक नागरिक
आज दिवसभर प्रिन्स क्लबचा हा वार्ता फलक नागरिकांचा चर्चेचा विषय होता. ही माहिती आरोग्य विभागाला मिळतात दुपारी दीड वाजता कचरा उठावाची गाडी या ठिकाणी आली व त्यांनी तो मजकूर पुसावा अशी विनंती केली
खरं म्हणजे या शहराला दोन विधानसभा आमदार दोन विधानपरिषद आमदार दोन खासदार एक वजनदार पालकमंत्री आणि एक पुण्यात असणारे कोल्हापूरचेच वजनदार कॅबिनेट मंत्री इतके लोकप्रतिनिधी असताना या कोल्हापूर शहराला प्राथमिक नागरी सुविधा मिळत नाहीत फक्त कोटींच्या निधीची घोषणा होते त्यामुळे हे जे लोकप्रतिनिधी आहेत ते एक तर फक्त मिरविण्यासाठी आहेत किंवा महापालिका प्रशासन त्यांना किंमत देत नसून त्यांचे काहीच ऐकत नसावी अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.