HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलचा देशातील ६० हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश

शिरोलीतील सिम्बॉलिक स्कूलचा देशातील ६० हायब्रीड लर्निंग स्कूल्समध्ये समावेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) पुलाची शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या शाळेची सीबीएसईने डिजिटल हायब्रीड लर्निंगसाठी निवड केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून सिम्बॉलिक या एकमेव शाळेची निवड झाली असून, देशातील पहिल्या ६० हायब्रीड लर्निंग शाळांमध्ये सिम्बॉलिकचा ही समावेश झाला आहे. 

सिम्बॉलिकमधील हायब्रीड लर्निंग नोड वर्ग खोल्यांचे उदघाट्न उद्योजक शिरीष सप्रे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थापिका गीता पाटील होत्या. 

     कोल्हापूर जिल्हा इंग्लिश मिडियम स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नायकुडे, विघ्नहर्ता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव पाटील, संचालक म्रिणाल पाटील प्रमुख उपस्थित होते.

      डिजिटल साधने आणि संसाधने एकत्रित करून तयार केलेला हायब्रीड लर्निंग प्रोग्राम विद्यार्थी आणि शिक्षक दोघांना सक्षम करेल, असा विश्वास उद्योजक शिरीष सप्रे यांनी व्यक्त केला.

शैक्षणिक क्षेत्रात होत असलेले डिजिटलाईजेशन, कोविड काळात ऑनलाईन क्लासला आलेले महत्व या पार्शवभूमीवर 'हायब्रीड लर्निंग'ला महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे सीबीएसई, मायक्रोसॉफ्ट व टॅग यांच्यावतीने सुरु केलेल्या 'हायब्रीड लर्निंग' उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून एकट्या सिम्बॉलिक शाळेची निवड केली आहे. 

देशातील 760 जिल्ह्यातील 27000 शाळांमधून 840 शाळांची हायब्रीड लर्निंग साठी निवड केली आहे. यामध्ये देशातील पहिल्या 60 शाळांमध्ये सिम्बॉलिकचा समावेश आहे, ही बाब अभिमानास्पद असल्याचे स्कूलच्या संस्थापिका गीता पाटील यांनी सांगितले.

हायब्रीड लर्निंग प्रोग्राममुळे आमच्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून कुशल शिक्षण घेण्यास मदत होणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सीबीएससी स्कूलना आम्ही सक्षमपणे मार्गदर्शन करू, असा विश्वास संचालक म्रिणाल पाटील यांनी व्यक्त केला. उपप्राचार्य तरन्नुम मुल्ला यांनी स्वागत केले. आभार शितल गुबचे यांनी मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.