कोरे अभियांत्रिकीत सायबर सिक्युरिटी वर चर्चासत्र

कोरे अभियांत्रिकीत सायबर सिक्युरिटी वर चर्चासत्र

वारणानगर (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात वाढत्या सायबर क्राईमचे प्रमाण बघता सायबर सिक्युरिटी हा विषय खूप महत्त्वाचा बनला आहे त्याच अनुषंगाने तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनोमस) वारणानगर महाविद्यालयाच्या ऑफ कॅम्पस नवे पारगाव येथे नव्याने सुरू होणाऱ्या सायबर सिक्युरिटी या अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक्रम ठरवणेसाठी चर्चासत्र पार पडले. सर्वसमावेशक अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार करण्यासाठी प्राध्यापक, उद्योग तज्ञ आणि शैक्षणिक सल्लागार एकत्र आले होते. प्रसिद्ध सायबर तज्ञ संदीप पाटील यांनी सायबर सेक्युरिटी क्षेत्रातील नवीन आवाहने, रोजगार संधी याविषयी मार्गदर्शन केले व त्यानुसार अभ्यासक्रम निश्चित करणेसाठी चर्चा केली.

यासाठी वारणा विविध व उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.अभ्यासक्रम डिझाइन बैठकीचे नेतृत्व संदीप पाटील यांनी केले. सदर बैठकीस  श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी,डॉ.व्ही.व्ही. कारजिन्नी, अधिष्ठाता, डॉ.एस.एम.पिसे, प्र.प्राचार्य, डॉ.डी.एन. माने, डॉ.शशिकुमार तोतड, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन विभाग प्रमुख, डॉ. एस. टी. जाधव आणि इतर प्राध्यापकांचा अभ्यासक्रम रचना बैठकीत उपस्थित होते.यावेळी संगणक विभाग प्रमुख डॉ.आर.बी.पाटील यांनी प्रास्ताविक केले.

चर्चा केलेल्या प्रमुख घटकांमध्ये प्रगत धोका विश्लेषण, नैतिक हॅकिंग आणि वास्तविक-जागतिक परिस्थिती यांचा समावेश आहे. विकसित होत असलेल्या सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेत योगदान देण्यासाठी सुसज्ज उच्च कुशल पदवीधर तयार करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्याची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षात होणार आहे.