महेंद्र ज्वेलर्स च्या "लाडकी लेक" स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 8 मार्च रोजी

महेंद्र ज्वेलर्स च्या "लाडकी लेक" स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 8 मार्च रोजी

कोल्हापूर : महेंद्र ज्वेलर्स च्या १२० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिनाच्या दिवशी लाडकी लेक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक ८ मार्च २०२५ रोजी डॉ. तारा भवाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. गेल्या महिनाभर चालू असलेल्या महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी च्या लाडकी लेक ह्या स्पर्धेला प्रचंड प्रमाणात ग्राहकांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोल्हापूर तसेच आजूबाजूंच्या विविध गावांमधून तसेच शेजारील जिल्ह्यांमधून सहभाग नोंदविला.  ह्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

ज्या कुटुंबात एकुलती एक मुलगी आहे जी कर्तृत्ववान आहे, जिने प्रतिकूल परीस्थितीत शिक्षण, कुटुंबाची जबाबदारी व आई वडिलांना सहकार्य करून जीवन घडवले आहे अश्या मुलींना प्रोत्साहन देण्याचा या उपक्रमाचा उद्देश खऱ्या अर्थाने सार्थक ठरला आहे. ह्या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या जीवनाचा संघर्षमय प्रवास सगळी जबाबदारी पार पाडत कसे यशाचे शिखर गाठले किंवा यशाच्या दिशेने कशी वाटचाल करत आहेत हे पाहायला मिळाले. सर्वच महिला स्पर्धकांनी या निमित्ताने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसल्या. ह्या स्पर्धेमध्ये ज्या उत्साहाने महिलांनी सहभाग नोंदविला तो खरंच खूप कौतुकास्पद होता व ह्यामुळे आम्हाला अजून चांगले काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळत आहे असे संचालक भरत ओसवाल यांनी सांगितले.

महिला दिनाचे औचित्य साधून महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरीच्या लाडकी लेक स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ डॉ. तारा भवाळकर यांच्या शुभ हस्ते नियोजित केले आहे. दिल्ली येथील नुकत्याच संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षा, उत्तम वक्त्या, श्रेष्ठ साहित्यिका व लेखिका आणि  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरभरून कौतुक केले अशा डॉ. तारा भवाळकर यांच्या उपस्तिथीमध्ये हा सोहळा निश्चितच अविस्मरणीय ठरेल.

तरी ह्या सन्मान सोहळ्यामध्ये प्रथम ५ विजेते घोषित केले जाणार आहेत व नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांचा सन्मान केला जाणार आहे असे महेंद्र ज्वेलर्स च्या वतीने कळविण्यात आलेले आहे.