मा. आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मा. आ. ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १७७ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  मा. आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बाजार समितीचे संचालक कुमार किशोर आहुजा, तसेच त्यांचे सहकारी वैभव अण्णा सावर्डेकर व महेश वारके यांच्या वतीने १७७ शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम बाजार समितीच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये संपन्न झाला.

शाळांचे प्रमुख पाहुणे म्हणून पंत वालावलकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका वृषाली कुलकर्णी, न्यानगंगा शाळेचे मुख्याध्यापक डी. बी. बेलेकर, तसेच प्रिन्स शिवाजी मंदिर शाळेचे मुख्याध्यापक नितीन चौगले यांचीही उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात एक हृदयस्पर्शी क्षणही अनुभवायला मिळाला. मागील बाजार समिती निवडणुकीत कुमार आहुजा आणि वैभव सावर्डेकर यांना समान मते मिळाल्याने लकी ड्रॉ घेण्यात आला होता. त्या वेळी लहानगी आराध्या लांबोरे हिने कुमार आहुजांच्या नावाची चिठ्ठी उचलली होती. त्या घटनेची आठवण ठेवत यंदा सलग दुसऱ्या वर्षी आराध्याला पुढील शिक्षणासाठी ७१११ रुपये रोख रक्कम, गणवेश आणि संपूर्ण शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी नविन सचिव तानाजी दळवी यांचा सर्व व्यापारी असोसिएशनतर्फे मा. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नीलकंठ करे, बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई, संचालक भारत भुयेकर, सुयोग वाडकर, पांडुरंग काशिद, संभाजी पाटील, सचिव तानाजी दळवी, शेतकरी संघाचे संचालक दत्ताजीराव वारके, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संजीवभाई पारीख, विजय कागले, विवेक शेटे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील तहसीलदार, सागर तहसीलदार, कृष्णा भुसारी, कांदा-बटाटा व्यापारी संघाचे अध्यक्ष मनोहर चुग, अशोक आहुजा, संजय पाटील, पिशवीकर दगडू जानकर, सुनिल खांडेकर, अनुप उबरणी, सुंदर पोपटाणी, जाकीर बागवान, शंकर सचदेव, भाजीपाला व्यापारी संताजी जाधव, किरण आद्राळकर, आकाश तोडकर, कमर्शियल बँकेचे चेअरमन अतुल शहा, माजी नगरसेवक तौफिक मुलानी, माजी स्थायी समिती सभापती राजेंद्र डकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.