सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे शिवसेनेकडून स्वागत* *साखर - पेढे वाटून शिवसैनिकांनी साजरा केला आनंदोत्सव*
कोल्हापूर दि.११ : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आज आपलं निरीक्षण नोंदवल. त्यानुसार मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप युती सरकारवर शिक्कामोर्तब झाले असून, या निकालाचे कोल्हापूर जिल्हा व शहर शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. कोल्हापूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र जमत शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून साखर - पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लगेचच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवे झेंडे फडकवीत "जय भवानी, जय शिवाजी", "शिवसेना जिंदाबाद", "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो", "मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे आगे बढो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर नागरिकांना शिवसैनिकांनी साखर - पेढे वाटले.
यावेळी बोलताना युवानेते श्री.ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही सर्व शिवसैनिक, पदाधिकारी स्वागत करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गतवर्षी जो उठाव झाला. यामध्ये शिवसेना वाढविण्यासाठी ज्यांनी आपली २५ - ३० वर्षे खर्ची केली शिवसेना वाढविण्यासाठी योगदान दिले त्यांनी मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला साथ दिली. आज मे.न्यायालयाने दिलेला निकाल हा शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा विजय असून, पुढील काळात शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिवसेना मुख्यमंत्री ना.मा.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. येणाऱ्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचा झंजावात पुन्हा निर्माण करू, असे प्रतिपादन केले.
य आनंदोत्सवात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, शिवसेना महानगरप्रमुख शिवाजी जाधव, समन्वयक जयवंत हारुगले, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उदय भोसले, किशोर घाटगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, युवा सेना शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, रिक्षा सेना शहरप्रमुख अल्लाउद्दिन नाकाडे, कपिल नाळे, रणजीत मंडलिक, सम्राट यादव, श्रीकांत मंडलिक, टिंकू देशपांडे, क्रांतीकुमार पाटील, नितीन मुधाले, मिलिंद साळोखे, अभिजित गजगेश्वर, राजू कदम, नजीर पठाण यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.