मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड;बँका ते जगभरातील विमानसेवा बंद

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड;बँका ते जगभरातील विमानसेवा बंद

मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे जगभरातील यूजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बिघाडामुळे अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडत असून, निळ्या रंगाची स्क्रीन दिसत आहे, ज्यामुळे यूजर्सच्या कामात अडथळा येत आहे. या समस्येचा परिणाम जगभरातील बॅंका आणि विमानतळांच्या कामावरही झाला आहे. मायक्रोसॉफ्टने या घटनेची दखल घेतली असून, कंपनीने याबाबत चौकशी सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे.

Crowdstrike ने केले निवेदन जारी 

या समस्येमुळे जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोज वर चालणारे लॅपटॉप आणि संगणक प्रभावित झाले आहेत. CROWDSTRIKE ने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे. CROWDSTRIKE च्या प्रतिनिधीने एक विधान जारी केले आहे की विंडोज चालवणाऱ्या मशीनवर BSOD समस्या निर्माण झाली आहे.