HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गणेश आरतीस मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या गणेश आरतीस  मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी द्वारे यंदा सलग पाचव्या वर्षी गणेशोत्सवाचा आयोजन केलं आहे. या निमित्तान दररोज विविध धार्मिक विधी देखील पार पाडले जातात. या उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते पुष्कराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं.

 

तर सायंकाळी मराठी चित्रपट सुष्टीतील चतुरस्त्र अभिनेते स्वप्निल राजशेखर, दिग्दर्शक अजय कुरणे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती संपन्न झाली. संघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्रेयस भगवान, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष कृष्णा चौगुले, सचिव सुरेश पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन मनस्वी सत्कार करण्यात आला. या सर्वच मान्यवरांशी वार्तालाप झाला. राजकीय, सामाजिक, चित्रपट क्षेत्रातील विविध किस्से, आठवणी, पोलीस दलातील नेहमीच्या जबाबदाऱ्या, कामाचे अनुभव याविषयी मनमोकळ्या गप्पा झाल्या. या निमित्तान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघात कार्यरत असणाऱ्या मध्यमकर्मींना एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली. यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.