सहज सेवा ट्रस्टचे अनछत्र सुरु,१३ एप्रिल पर्यंत राहणार सुरू ..!

सहज सेवा ट्रस्टचे अनछत्र सुरु,१३ एप्रिल पर्यंत राहणार सुरू ..!

कोल्हापूर -  जोतिबा देवाची यात्रा शनिवारी होत आहे. दरवर्षी या यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी सहज सेवा ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र उपक्रम राबविला जातो याही वर्षी जोतिबा डोंगर गायमुख येथे सहज सेवा ट्रस्टचे अनछत्र प्रथम येणाऱ्या जोतिबा भक्ताच्या शुभ हस्ते सुरू करण्यात आले.१३ एप्रिल पर्यंत अखेर सुरू राहणार आहे. आज पासून याची सुरुवात करण्यात आली.आज सकाळ पासुनच भक्तांची गर्दी वाढत होती. त्यानुसार प्रसाद तयार करण्यात येत आला. आज प्रसादासाठी भात,वांगी, बटाटा भाजी, शिरा,आमटी आणि मठ्ठाची सोय करण्यात आली होती.

अनछत्रा साठी लागणारे सर्व साहित्य गायमुख येथे पोहच झाले आहे. सर्व विश्वस्थ व स्वंयसेवक यांची नियोजनासाठी धावपळ सुरु आहे. आरोग्य विभागा मार्फत दवाखाना सुरु झाला आहे. नंदादिप नेत्रालयच्या वतिने प्राथमिक डोळे तपासणी केद्र सुरु झाले आहे. रक्तदान शिबिर सुरु आहे.

जेवणा बरोबर चहा मट्टाही चालू आहे.  येणारे भक्त याचा लाभ घेत आहेत. ताजी भाजी हि मोठ्या प्रमाणात आली आहे ती नीट करण्याचं काम सुरु आहे.१५ हजार स्वे. फूट भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे. आज सुरु झालेले अन्नछत्र १३ तारखेपर्यत अहोरात्र सुरु राहणार आहे. यासाठी असंख्य हात याठिकाणी राबत आहेत.