मुलांचा बौधिक विकास होण्यासाठी सहा महिने बाळाला आईचे स्तनपान आवश्यक - डॉ. योगेश साळे

मुलांचा बौधिक विकास होण्यासाठी सहा महिने बाळाला आईचे स्तनपान आवश्यक - डॉ. योगेश साळे

कोल्हापूर (प्रतिनिधि) : समाजातील जुन्या रुढी परंपरा विसरुण मुलांचा बौधिक विकास होणे, त्याच बरोबर मुलांचे आरोग्य सदृढ होण्याकरिता स्तनपान किती गरजेचे आहे याचे महत्व सांगून, त्यामध्ये बालमृत्यु कमी होणे व बालक सदृढ होणेसाठी अत्यंत प्रभावी आहे. मातेकडुन जन्मानंतर त्वरित स्तनपान दिल्यास बालक विविध आजारा पासुन सुरक्षित राहते. असं प्रतिपादन कुटुंब कल्याण प्रशिक्षक केंद्राचे प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी केले.

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सुचने नुसार जागतिक स्तनपान सप्ताह दि. १ ते ७ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्य विभाग यांचे मार्फत साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तीकेयन व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. 

 केंद्रशासन हे जागतिक स्तनपान सप्ताह दि.०१ ते ७ ऑगस्ट साजरा करते. त्यामुळे स्तनपानाच्या पध्दती सुधारण्यासाठी स्तानदा मातांना सुरक्षित वातावरण निर्माती करणे, बालमृत्यु कमी करणे, पोषण सुधारणा आणि बालपणीच्या प्रारंभिक विकासा मध्ये निव्वळ स्तनपानाच्या भूमिकेवर भर देण्यासाठी जनजागृती समाजात निर्माण होते. असं मत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांनी व्यक्त केल.

या वर्षी "आई आणि बाळा मधील अंतर कमी करुया स्तनपानाला समर्थन देऊया" ही थिम निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील सर्व प्रसुती केंद्रामध्ये  जन्मानंतर १ तासाच्या आत बाळाला स्तनपान देणे आणि मातांना स्तनपानासाठी पुरेसा पाठिंबा देण्याकरीता राज्यातील सर्व प्रसुती केंद्रांवर केंद्र शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. 

यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे व इतर आरोग्य विभागाती प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी आभार मानले.