येळवडे येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा भोगावती नदीत बुडून मृत्यू

येळवडे येथील शाळकरी विद्यार्थ्यांचा भोगावती नदीत बुडून मृत्यू

राधानगरी प्रतिनिधी :- निवास हुजरे 

येळवडे ता. राधानगरी येथील 8 वी मध्ये शाळकरी विद्यार्थी शिकणारा विद्यार्थी कु. श्रीधर संभाजी राबाडे हा वडील संभाजी राबाडे यांच्याबरोबर येळवडे कोदवडे दरम्यान असणाऱ्या पाणंदी जवळील शेताकडे गेला होता. शेतातील काम आटोपून श्रीधर हातपाय धुण्यासाठी जवळच असणाऱ्या भोगावती नदीत दुपारी 1 च्या सुमारास गेला असताना पाय घसरून तो पाण्यात पडला, त्याला पोहता येत नसल्यामुळे तो बुडाला. बराच वेळ न परतल्यामुळे नदीपात्रात शोधाशोध घेतल्यावर त्याचा मृतदेह सापडला.

घटनास्थळी राधानगरी पोलीस स्टेशनच्या निरीक्षक स्वाती गायकवाड, कॉन्स्टेबल कृष्णात यादव यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. व सोलांकुर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

सदर घटनेची माहिती मिळताच येळवडे व कोदवडे येथील नागरिकांनी व महिलांनी मोठी गर्दी केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.