अध्यापिका सारिका पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महिला संघटकपदी

अध्यापिका सारिका पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महिला संघटकपदी

अध्यापिका सारिका पाटील यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महिला संघटकपदी

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे

मांगोली (ता. राधानगरी) येथील व नरतवडे विद्यामंदिर शाळेच्या अध्यापिका सारिका अजित पाटील यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या जिल्हा महिला संघटकपदी नुकतीच निवड झाली.याबद्दल त्यांचा अनंतशांती च्या वतीने सन्मानपत्र, शाल, फेटा, पुष्पगुच्छ देऊन सत्कार अध्यापिका सारिका पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक अन्य क्षेत्रात केलेल्या कामाची दखल घेऊन ही निवड केली आहे.या त्यांच्या निवडीने सर्वत्र अभिनंदन होत आहे.सत्कार प्रसंगी अनंतशांतीचे संस्थापक अध्यक्ष मा. भगवान गुरव अध्यक्षा माधुरी खोत, सचिव - अरुणा पाटील, राधानगरी - भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले, राजर्षी शाहू गव्हर्नमेंट बँकेचे संचालक अजित पाटील व त्यांचे कटुंबिय उपस्थित होते.