राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

राजर्षि शाहू गव्हमेंट सर्व्हटस् बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील राजर्षि शाहू गवामेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँक लि., कोल्हापूर या बँकेची 107 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांच्या उस्फूर्त प्रतिसादात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉल, सागरमाळ, कोल्हापूर येथे उत्साहात संपन्न झाली. बँकेचे संचालक विलासराव कुरणे यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयावर वाचनास प्रारंभ केले. सुरवातीस कोल्हापूरचा सुपूत्र ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्निल कुसाळे याचे अभिनंदन करण्यात आले. अहवाल सालात निधन झालेल्या व्यक्तींना तसेच देशातील थोर व्यक्ती, लेखक, कवि, नेते, हितचितंक, सभासद व ज्ञात, अज्ञात व्यक्ती, ठेवीदार, मातृभूमीसाठी वेश रक्षणार्थ धारातीर्थी पडलेले बौर जबान, यांना अंतःकरणपूर्वक श्रद्धांजली वाहण्यात आली.

प्रास्ताविकामध्ये बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील (एम.एस.) यांनी बँकेने 107 वर्षे पूर्ण केली असून बँकेने " 108 व्या" वर्षात पदार्पण केले आहे. बँकेच्या सर्व सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवून सहकार्य केल्याबद्दल आभार मानले. आपल्या पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवीचा बढ़ता आलेख कायम ठेवलेला असून, बँकेने रु.200 कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण केला असून आज रोजी बँकेकडे रु.221 कोटी इतक्या ठेवी असल्याचे सांगितले. बँकेने सलग चौदा वर्षे 0% (शून्य टक्के) एनपीए ठेवून बँकेने रक्कम रु.2 कोटी 47 लाख इतका विक्रमी नफा मिळविलेला आहे हे बँकेचे प्रगतीचे व स्यैयाचे प्रतिक असलेचे सांगितले,

सभासदांना वितरीत करण्यात येणाऱ्या कर्जाची कमाल मर्यादा रु. 21 लाखावरुन वाढवून कर्जाची कमाल एकत्रित मर्यादा रु. 25 लाख इतकी व आकस्मिक कर्जाची मर्यादा रु. 1.50 लाखावरुन वाढवून रु. 2 लाख इतकी करणेत आलेचे अध्यक्ष मधुकर पाटील (एम.एस.) यांनी जाहिर केले. भविष्यात कर्जाची मर्यादा आणखीन वाढविणार असलेचे नमूद करुन निवडणूकीमध्ये दिलेली आश्वासने टप्प्याटप्याने पूर्ण करणार असलेचे यावेळी सांगितले.

अहवाल सालात बँकेस ऑडिट वर्ग "अ" तसेच रिझर्व्ह बँकेने ग्रेड-1 मानांकन असल्याचे सांगितले. तसेच सभासदांना सन 2023-24 सालासाठी 8% लाभांश देण्याचे जाहिर केले. सदरचा डिव्हिडंड त्वरीत वाटप सुरु करणार असलेचे सांगितले. बँकेतर्फे राबविणेत येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती गावेळी उपस्थित सभासदांना देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश रा. शिंदे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषयानुसार अहवाल वाचन केले. विषयवार सविस्तर चर्चा होऊन ते सर्व विषय एकमताने हात उंचावून / आवाजी मतदानाने मंजूर करणेत आले. यावेळी बँकेचे कार्यक्षेत्र सात जिल्ह्याचे आहे ते वाढवून बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य करणेबाबतचा ठराव एकमताने मंजूर करणेत आला.

सभासदांनी दिलेले लेखी प्रश्न व सूचनांचे निरसन उभय संचालकांनी केलेने सभा खेळीमेळीत पार पडली, यावेळी बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील (एम.एम.), उपाध्यक्ष अरविंद आगरे, संचालक सर्वश्री रविंद्र पंधारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलासराव कुरणे, रमेश घाटगे, सदानंद पाटगे, अजित पाटील, संचालिका हेमा पाटील, श्रीमती. मनुजा रेणके, संचालक संजय खोत, किशोर पोत्ार, प्रकाश पाटील, तज्ञ संचालक दिपक पाटील, गणपत भालकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे व कर्मचारी उपस्थित होते.

बँकेचे उपाध्यक्ष अरविंद आयरे यांनी आभार मानले.