HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

राजारामपुरी एक्सटेंशन परिसरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचा खास.धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

राजारामपुरी एक्सटेंशन परिसरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचा खास.धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधि) :  राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील रस्त्यांची कामे पूर्ण केली जातील.  त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला जाईल. त्याचप्रमाणे टाकाळयावरील छत्रपती शाहू जलतरण तलाव लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापुरातील राजारामपुरी एक्सटेंशनमध्ये सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांच्या कामांची त्यांच्या हस्ते सुरूवात झाली. यावेळी ते बोलत होते.

खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यातून राजारामपूरी एक्सटेन्शनमध्ये २० लाख रूपये निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाची सुरवात झाली.  जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून हा १०० मीटरचा रस्ता बनवला जाणार आहे. यामुळे रस्ते खड्डेमुक्त होवून, नागरिकांची सोय होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. या रस्त्याबरोबरच राजारामपुरी एक्सटेंशन आणि टाकाळा परिसरातील सर्व रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण केली जातील. त्यासाठी आणखी पाच कोटी रूपयांची तरतुद करत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी स्पष्ट केले. टाकाळयावरील बंद असलेला जलतरण तलाव पुन्हा लवकरच सुरू केला जाईल, अशी ग्वाही खासदार महाडिक यांनी दिली. 

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील अनेक समस्या आपण सोडवत असून, या मतदार संघात नागरिकांना विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे माजी आमदार अमल महाडीक यांनी सांगितले.

यावेळी प्रा. जयंत पाटील, सत्यजित कदम, माजी महापौर दीपक जाधव, मुरलीधर जाधव, हेमंत पाटील, नरेंद्र मांगलेकर, करण जाधव, हरिष टिंडवाली, अभिजीत शिंदे, रविंद्र मुतगी यांच्यासह शिवशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.