राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता

कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास बुधवार दि.२६ जुलै रोजी राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या राधानगरी धरण हे 95. 56 टक्के भरले आहे. आज रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या पहाटे राधानगरीचे स्वयंचलित दरवाजे खुले होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेत जलसंपदा विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.