राष्ट्रवादी काँग्रेस आता दिल्लीच्या मैदानात उतरणार

राष्ट्रवादी काँग्रेस आता दिल्लीच्या मैदानात उतरणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आता राजधानी दिल्ली विधानसभेची निवडणुक लढविणार आहे.  त्यानुसार शनिवारी या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जाहीर केली.

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका साधारण फेब्रुवारीमध्ये  होणार आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष कमला लागले आहेत. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.  त्यात बुराडी येथून रतन त्यागी, बादली मतदारसंघातून मुलायमसिंह, मंगोलपुरी येथून खेम चंद, चांदनी चौकातून खालिद उर रहमान, बल्लीमारन येथून महंमद हारून, छतरपूर येथून नरेंद्र तंवर, संगम विहार मतदारसंघातून कमर अहमद, ओखला येथून इमरान सैफी, लक्ष्मीनगर मतदारसंघातून श्री नमह, सीमा पुरी मतदारसंघातून राजेश लोहिया, गोकल पुरी येथून जगदीश भगत यांना मैदानात उतरवले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत चार किंवा जास्त राज्यांमध्ये वैध मतांपैकी कमीत कमी सहा टक्के मते मिळणे गरजेचे असते. पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी अन्य राज्यातून निवडणूका लढविणे आवश्यक आहे.