HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर सतीश प्रधान यांचे निधन

ठाणे : ठाणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष, ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर, माजी राज्यसभा खासदार सतीश प्रधान यांचे रविवारी दुपारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ होते. त्यांच्या पश्चात मुलगा कमलेश, सून मानसी, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासात तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत मोठे योगदान दिले होते. 

सतीश प्रधान ठाणे शहराचे पहिले नगराध्यक्ष होते. त्यांनी १९७४-८१ पर्यंत ठाण्याचे नगराध्यक्ष म्हणून  काम पाहिले. शहरात शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर १९८६-८७ या काळात त्यांनी शहराचे पहिले महापौरपद भूषविले. यासोबत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समित्यांवर त्यांनी काम केले. 

१९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर सतिश प्रधान यांनी ठाण्याला नवे बदल स्वीकारण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. सांस्कृतिक विकासाद्वारेच त्यांनी लहान मुलांवर मैदानी संस्कार करण्याच्या हेतुने ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली प्रधान यांनी रोवली.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.