HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

वारणा विद्यापीठ आणि व्हीएसकेवाय सोल्यूशन्स, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार

वारणा विद्यापीठ आणि व्हीएसकेवाय सोल्यूशन्स, अमेरिका यांच्यात सामंजस्य करार

वारणानगर (प्रतिनिधी) - वारणा विद्यापीठ (महाराष्ट्रातील पहिले राज्य समूह सार्वजनिक समूह विद्यापीठ) आणि आयटी कन्सल्टिंग, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन व एंटरप्राइझ सोल्यूशन्स क्षेत्रातील आघाडीची आंतरराष्ट्रीय कंपनी  व्हीएसकेवाय सोल्यूशन्स, अमेरिका यांच्यात, वारणानगर येथे सामंजस्य करार झाला. या करारावर वारणा विद्यापीठाकडून श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी आणि व्हीएसकेवाय सोल्यूशन्सकडून सीइओ विकास हवालदार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

या कराराच्या प्रमुख बाबींमध्ये संयुक्त अभ्यासक्रम निर्मिती, तज्ज्ञांची व्याख्याने, विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप व प्लेसमेंट संधी, संयुक्त संशोधन प्रकल्प, शोध निबंध प्रकाशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, IoT व क्लाउड कंप्युटिंग या क्षेत्रांत नवप्रवर्तन, तसेच प्राध्यापक व विद्यार्थी देवाणघेवाण व स्टार्टअप इन्क्युबेशन हबची स्थापना यांचा समावेश आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील हेकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यासाठी व्हीएसकेवाय सोल्यूशन्स सहकार्य करणार आहे.

वारणा विद्यापीठाच्या या पुढाकाराबद्दल श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी शुभेच्छा दिल्या. या सामंजस्य करारामुळे दोन्ही संस्थांमध्ये जागतिक शैक्षणिक सहकार्याचे दार खुले होणार असून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय करिअर व नवउद्योजकतेच्या दिशेने भक्कम दिशा मिळणार आहे. या करारासाठी अधिष्ठाता, डॉ. एस. एम.पिसे, डॉ. बी. टी. साळोखे, डॉ. डी. एन. माने, प्रा. बी. आर. बागणे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावेळी डॉ. विलास व्ही. कारजिन्नी,  व्हीएसकेवाय सोल्यूशन्सचे, सीईओ विकास हवालदार, डेव्हिड करन, डॉ.एस. एम. पिसे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.