छत्रपती शाहू महाराजांचा कलेला राजाश्रय देण्याचा वारसा विक्रमसिंहराजेंनी कृतीतून चालविला - अमरसिंह घोरपडे

छत्रपती शाहू महाराजांचा कलेला राजाश्रय देण्याचा वारसा विक्रमसिंहराजेंनी कृतीतून चालविला - अमरसिंह घोरपडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - छत्रपती शाहू महाराजांचा कलेला राजाश्रय देण्याचा वारसा स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे कृतीतून चालविला,असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले.

शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त येथील न्या. रानडे विद्यालयात आयोजित चित्रकला स्पर्धेच्या उदघाटनवेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. येथे एक हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रणित श्री छत्रपती शाहू कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

घोरपडे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी व या क्षेत्रात त्यांनी नावलौकिक मिळवावा, या उदात्त हेतूने या चित्रकला स्पर्धा घेतल्या जातात. शाहू ग्रुपचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ५५ व्या वाढदिवसाचे निमित्ताने २००३ पासून या स्पर्धा घेण्यात येत आहेत.आता त्यांच्या जयंती निमित्त या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडत आहेत. सुरुवातीला फक्त कागल केंद्रावर होणाऱ्या या स्पर्धा पालक व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आता कागलसह मुरगूड,सेनापती कापशी व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर घेण्यात येत आहेत. त्यास विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे.

कागल पंचायत समितीचे माजी सभापती दत्तोपंत वालावलकर म्हणाले, स्वर्गीय राजेसाहेब यांनी कागल तालुक्याच्या औद्योगिकीकरणाचा पाया घातला. त्यांनी सहकार कला क्रीडा कृषी अशा विविध आणखी क्षेत्रात उत्तूंग कार्य केले. शाहू साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अल्पभूधारक शेतकरी सर्वसामान्य कामगार यांचे संसार फुलवले.

यावेळी महेश देशपांडे, मोहन मोरे, राजे बॅंकेचे संचालक प्रकाश पाटील, संजय चौगुले, मोहन शेटके, संजय बरकाळे, सुनील रणनवरे, मकरंद कोळी, दिलीप तिप्पे, सागर मोहिते, शहाजी लुगडे, जगदीश मोरे, नाथाजी पाटील, यशवंत पाटील, राम चेचर, भिकाजी तिप्पे यांच्यासह आदी उपस्थित होते.