विकास सेवा संस्था सचिवांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबीराचे आयोजन

विकास सेवा संस्था सचिवांच्या आरोग्य तपासणीसाठी शिबीराचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) - करवीर तालुक्यातील विकास सेवा संस्थांचे सचिव यांच्या आरोग्य तपासणी कॅम्प आयोजित करण्याचे तसेच तालुक्यातील सहकारी संस्थाच्या तक्रानिवारणाकरिता परिपत्रकीय सुचना प्राप्त आहेत. त्यास अनुसरुन तालुका स्तरावर विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी या शिबीरामध्ये त्यांच्या तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांनी केले आहे. 

करवीर तालुक्यातील सहाकारी संस्थाच्या तक्रार निवारणाकरीता  4 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत शेतकरी निवास मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे शिबीर आयोजित केले आहे. तसेच करवीर तालुक्यातील विकास सेवा संस्था सचिव यांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी शेतकरी निवास मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर कृषि उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर येथे  4 जुलै रोजी सकाळी 12 ते 2 या वेळेत शिबीराचे आयोजन केले आहे.

तपासणी कॅम्पसाठी दक्षिण विधान सभा सदस्य आमदार अमल महाडिक व करवीर तालुक्यातील तक्रार निवारण शिबिरासाठी करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

आरोग्य कॅम्पसाठी तालुका आरोग्य अधिकारी मदने व त्यांचे सहकारी आरोग्य विस्तार अधिकारी बी. जी. साठे, करवीरच्या विस्तार अधिकारी  ए. आय. चव्हाण व आरोग्य सहाय्यक एम. एन. डोणगे हे आरोग्य तपासणी करणार आहेत. तसेच तालुका तक्रार निवारण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. तक्रार नोंदविण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeG_1N3wLqshu7J6M4iserklxnYpXgEOmAVoiKpnp_elszQ/viewform?usp=header या लिंकचा वापर करावा, असेही राठोड यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.