संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला 'उत्कृष्ट उपक्रमशील शाळा' पुरस्कार
हातकणंगले प्रतिनिधी : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत ' ब्रेन फीड मॅगझीनमार्फत दिला जाणारा जीवन कौशल्य शिक्षण, सर्वसमावेशक शिक्षण आणि सामुदायिक व सहयोगी उपक्रमांमध्ये उत्कृष्टतेसाठी हा पुरस्कार प्राप्त केला. हैदराबाद येथील हायटेक सेंटर येथे झालेल्या एज्युकेटर्स कॉन्फरन्समध्ये भारतातील अनेक शिक्षण तज्ञांच्या उपस्थितीत 'ब्रेनफीड इटी टेक एक्स' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रेनफीड मॅगझिनचे मुख्य संपादक श्री ब्रह्म व्ही के यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य डॉ एच एम नवीन यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या सन्मानाप्रति बोलताना संचालिका श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण या सर्व गोष्टींमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला
चेअरमन संजय घोडावत आणि विश्वस्त विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, बोर्डिंग स्कुलचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य अस्कर अली, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी अभिनंदन केले व आभार मानले.