वृक्ष प्रेमी ऑरगनायजेशनच्या वतीने फळ विक्रेत्यांना कापडी पिशव्या, स्टील कपांचे वाटप

वृक्ष प्रेमी ऑरगनायजेशनच्या वतीने फळ विक्रेत्यांना कापडी पिशव्या, स्टील कपांचे वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधि) : प्लास्टिक कचरा मुक्त कोल्हापूर आणि वृक्ष प्रेमी ऑरगनायजेशन च्या वतीने शाहूपुरी मंडई येथील फळ विक्रेत्यांना कापडी पिशव्या वाटप आणि फळ विक्रेते आणि भाजी विक्रेते याना चहा पिण्यासाठी स्टील कपांचे वाटप काल करण्यात आले.

प्लास्टिक पिशव्या आणि चहाचे कागदी कप न वापराबाबत ही प्रबोधन मोहीम घेण्यात आली. कोल्हापूर मध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला प्लास्टिक कचरा यावर सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फळे घेणाऱ्या ग्राहकांना कापडी पिशवी चा आग्रह करा असे आवाहन सर्व फळ विक्रेत्यांना करण्यात आले. तसेच सर्व फळ विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांना ते चहा पीत असलेले कागदी कप हे प्लास्टिक लेयर चे आहेत आणि हे तुमच्या आरोग्यास अत्यंत घातक आहेत. घेण्यात आलेल्या या मोहिमेस फळ आणि भाजी विक्रेते यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला .या मोहिमेत 150 कापडी पिशव्या आणि 75 स्टील कपांचे वाटप करण्यात आले.

या मोहिमेत सविता साळोखे, संजीव चिपळूणकर, विदुला स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी अर्चना कुलकर्णी, धनश्री भगत, शिवम जाधव, प्रवीण मगदूम,अमित कारंडे, दीपक गायकवाड, तात्या गोवावाला ,सचिन पोवार,अमर संकपाळ, माधवी पवार उपस्थित होत्या.