जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. यांचा असाही मनाचा मोठेपणा

जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेयन एस. यांचा असाही मनाचा मोठेपणा

कोल्हापूर (प्रतिनिधी) क्लासवन अधिकारी म्हटलं की मोठा रुबाब असतोच. रुबाब मिरवणाऱ्या अधिकाऱ्यांची काही कमी नाही. मात्र पुन्हा एकदा आज जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सीईओ कार्तिकेयन एस यांच्या मनाचा मोठेपणा पाहायला मिळाला.

     कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये आज सायंकाळी नेहमी प्रमाणे कार्तिकेयन एस. हे घरी जाण्यासाठी त्यांची गाडी जिल्हा परिषदेच्या पोर्चमध्ये लागली होती. परंतु यावेळी उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक यांना वेगळाच आश्चर्य चा धक्का बसला. परंतु हा धक्का उपस्थितांच्या मनाला समाधान देणारा होता. आजच्या कलयुगात मनाचा मोठेपणा, अधिकाऱ्यांतील माणुसकी, आपल्या शिपाई कर्मचारी बद्धल असणारी आस्था पाहायला मिळाली.

     मुख्य कार्यकारी अधिकारी याच्या केबिनच्या बाहेर बेलला असणारे शिवदास पांडुरंग भणगे( हवालदार) हे 40 वर्षे सेवा पूर्ण करून आज ते सेवा निवृत्त झाले. जाते वेळी भणगे मामा सेवेतील शेवटचा दिवस म्हणून सायंकाळी कार्तिकेयन एस. यांना भेटण्यासाठी गेले. त्यावेळी चक्क कार्तिकेयन एस हे आपल्या केबिन मधून बाहेर येवून भनगे मामा यांच्यासोबत पोर्चमध्ये आले. आणि स्वतःच्या गाडीत आपल्या सीटवर त्यांना आदराने बसविले. हे पोर्च मध्ये उपस्थित असलेल्यांनी पाहिलं ते सर्वजण भारावून गेले. भनगे मामानाही हे सर्व पाहून आपल्या नोकरीच्या चाळीस वर्षाच्या सेवेच सार्थक झालं असंच वाटलं असेल.भणगे मामांच्या शेजारीच सीईओ बसले. ड्रायव्हरच्या पुढील बाजूच्या सीटवर सीईओंचे स्वीय सहाय्यक प्रल्हाद पाटील बसले होते. त्यानंतर गाडी जिल्हा परिषदच्या गेटमधून बाहेर पडली ते थेट भणगे मामा यांच्या वाशी नाका येथील घराची जरी जाऊन थांबली. भणगे मामा यांना घरी सोडून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेने एस पुन्हा जिल्हा परिषद मध्ये आले. यानिमित्ताने कार्तिकेयन एस यांच्यातील मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.