स्वच्छता ही सेवा मोहीम 2024 जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी अमोल येडगे

स्वच्छता ही सेवा मोहीम 2024 जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी -जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  स्वच्छ भारत मिशन-ग्रामीण व शहरी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोंबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो.  त्या निमित्ताने स्वच्छता ही सेवा मोहीम दि.17 सप्टेंबर  ते दि. 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही थीम निश्चित केली आहे. 

 या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व अस्वच्छ ठिकाणे निवडून ती कायम स्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी नियोजन करावे तसेच स्वच्छता ही सेवा ( SHS 2024 ) मोहीमे अंतर्गत उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणेत यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता ही सेवा 2024 या मोहिमेच्या अंमलबजावणी अनुषंगाने आढावा बैठकीवेळी निर्देश देणेत आले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी, ग्रामपंचायत, नगरपालिका येथे स्वच्छता मोहिमेचा आराखडा तयार करुन, स्वच्छता मोहिमेत NCC,NSS , स्वयंसेवी संस्थाना सहभागी करुन घ्यावे. गावांच्या, नगरांच्या प्रवेश व्दारा जवळ स्वच्छता करुन, सुशोभिकरण करावे.  वृक्षारोपन उपक्रम सर्व ठिकाणी घेणेत यावा. स्वच्छता उपक्रमामध्ये शाळेचा सहभाग घेणेत यावा. शाळेमध्ये स्वच्छता संदेश देणा-या स्पर्धांचे आयोजन करावे. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, शाळा व महाविद्यालयामध्ये स्पर्धा कचरा वर्गीकरण चर्चा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, प्रश्नमंजुषा इ. स्पर्धा घेणे. प्लस्टीक –Bricks उपक्रम शाळेमध्ये राबविणेत यावा. यातुन गार्डन वॉल, कंपाऊड वॉल, सुशोभिकरण करणेत यावे. प्लस्टीक वापर कमी कमी करणेबाबत विद्यार्थांना संदेश देणेत यावा. प्लस्टीकला पर्यायी कापडी पिशवी वापराबाबत जनजागृती करावी. ग्रामपंचायत तसेच नगरपालिकांनी कापडी पिशवीचे वाटप करावे या पिशवी वर स्वच्छता संदेश काढावेत यासाठी ग्रामपंचायत निधी, CSR निधीचा वापर करावा. 

सफाई मित्र सुरक्षा शिबीर या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. शासनाच्या विविध योजनांचे लाभ स्वच्छता कर्मचा-यांना देणेसाठी उपक्रम राबवावेत. आरोग्य विभागने पावसाळयात राबविलेले स्वच्छता उपक्रम या सप्ताहा मध्ये राबवावेत. पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता, शुध्दीकरण करणे, पाणी गुणवत्ते बाबत जनजागृती करणेत यावी. सर्व विभागांनी आपल्या समन्वयातुन स्वच्छता ही सेवा मोहिम राबवावी अशी सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी यावेळी, जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतींनी स्वच्छता मोहिम राबविणेच्या जागा निश्चित कराव्यात. Legacy Waste Sites कचरा साचलेल्या जागांची निवड करावी. विशेष करुन जिल्हयात प्रवेश होणा-या गावांनी राज्य मार्ग, राष्ट्रीय मार्ग अशा ठिकाणच्या जागांची निवड करावी. स्वच्छता करणे पुर्वीचे फोटो व स्वच्छता केले नंतरचे फोटो घेणेत यावे. या ठिकाणी होणारी स्वच्छता हि कायमस्वरुपी राखली गेली पाहीजे याचे नियोजन करणेत यावे.  तसेच एक दिवस श्रमदानासाठी मध्ये सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक व बाजारपेठे, सार्वजनिक वाहतुक केंद्रे, प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तु, वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, इत्यादी ठिकाणी जास्तीत जास्त लोकसहभाग घेवुन, स्वच्छता हि सेवा मोहिम उपक्रमाच्या वेळापत्रकानुसार अंमलबजावणी करावी. या उपक्रमाची माहिती व फोटो शासनाच्या पोर्टलवर अद्ययावत करणेची सुचना देणेत आली.

 या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुध्द पिंपळे, जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन माधुरी परीट, शिक्षणाधिकारी (प्रा.) मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (मा.) एकनाथ आंबोकर, महानगर पालिका उपआयुक्त राहुल रोकडे, जिल्हा सह आयुक्त न.पा. प्रशासन नागेंद्र मुतकेकर, एनसीसी विभागचे प्रतिनिधी भोसले यांचेसह विभागचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच या बैठकीसाठी ऑनलाईन व्ही सी व्दारे प्रादेशिक अधिकारी (MIDC), तहसिलदार, गट विकास अधिकारी , गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपालिका/ नगरपरिषद, विभाग प्रमुख राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, नेहुर युवा केंद्र आदी उपस्थित होते.