HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

वारणानगरमधील केडीसीसी बँकेत ३.२१ कोटींचा अपहार, पाच जणांवर गुन्हा दाखल

वारणानगरमधील केडीसीसी बँकेत ३.२१ कोटींचा अपहार, पाच जणांवर गुन्हा दाखल

वारणानगर (प्रतिनिधी) - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) वारणानगर शाखेत तब्बल ३ कोटी २१ लाख ९१ हजार ६१९ रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आर्थिक घोटाळ्यामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शाखाधिकारीसह पाच कर्मचाऱ्यांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या शाखाधिकाऱ्याचा शोध सुरु आहे.

बँकेत बनावट खाती उघडणे, खोट्या सह्यांद्वारे पे स्लिप व धनादेशांवरून पैसे काढणे, तसेच इतर कर्मचाऱ्यांचे युजर आयडी व पासवर्ड वापरून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. बँकेच्या ऑडिट विभागाने कागदपत्रांची मागणी केली असता तीही नाकारण्यात आली होती.

या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो बेलवळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, १५ जुलै २०२१ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत घोटाळा झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे - 

- तानाजी ईश्वरा पोवार (शाखाधिकारी, सध्या फरार)

- मुकेश विलास पाटील (क्लार्क)

- शिवाजी शहाजी पाटील (कॅशियर)

- मिनाक्षी भगवान कांबळे

- शरीफ मुन्तांज मुल्ला

या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की व कोडोली पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास कोडग करत आहेत.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.