शालेय विदयार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेची कारवाई

शालेय विदयार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर वाहतूक शाखेची कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरामध्ये शाळकरी मुलांची ने-आण करणा-या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसविण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांच्या मार्गदर्शनानुसार शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीकरीता शासनाने नियमावली निर्गमित केलेली आहे. त्यानुसार विदयार्थ्यांना शाळेत ने आण होत असताना योग्य सुरक्षा प्राप्त होणे आवश्यक असल्याने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, कोल्हापूर कडुन ०८ जुलै ते १० जुलै या तीन दिवसांच्या कालावधी मध्ये विदयार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करुन परवान्यापेक्षा जास्त विदयार्थी यांची वाहतूक करुन वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांविरुध्द विशेष व्यापक मोहीम राबवुन एकूण ४६ शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली आहे. 

शहर वाहतूक शाखा, कोल्हापूर यांच्या वतीने शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनधारकांना आवाहन करण्यात येते की, क्षमतेपेक्षा परवान्यापेक्षा जास्त विदयार्थी आपले वाहनांत बसवून धोकादायक वाहतूक करु नये व आपल्यावर होणारी कायदेशीर कारवाई टाळावी. यापुढे अशी कारवाई सातत्याने करण्यात येणार असल्याचंही वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं आहे. 

ही कारवाई शहर वाहतुक शाखेकडील प्रभारी अधिकारी नंदकुमार मोरे यांचे निरीक्षणाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.