'शाहू' च्या चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण गायकवाड,कस्तुरी कदम,अवनी चौगुले व मयुरी भोसले सर्वोत्कृष्ट

'शाहू' च्या चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण गायकवाड,कस्तुरी कदम,अवनी चौगुले व मयुरी भोसले सर्वोत्कृष्ट

कागल (प्रतिनिधी) - शाहू उद्योग समुहाचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७७ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत जयकृष्ण गायकवाड(कणेरी), कस्तुरी कदम(गोकुळ शिरगाव),अवनी चौगुले(कागल) व मयुरी भोसले (निपाणी) हे विद्यार्थी आपापल्या गटात सर्वोत्कृष्ट ठरले.

श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना व श्री छत्रपती शाहू कला, क्रीडा,व सांस्कृतिक मंडळ कागल यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा झाल्या. कागल, मुरगुड ,सेनापती कापशी व कणेरी अशा चार केंद्रांवर या स्पर्धा एकाचवेळी झाल्या. सर्व विजेत्यांना श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल कागल येथे मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते समारंभपूर्वक बक्षीस वितरण केले जाते. बक्षीस वितरण समारंभाची तारीख संबंधित शाळेकडे कळविली जाते. तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र संबंधित शाळेमध्ये पोहोच केले जाते. परीक्षक म्हणून रावसाहेब शेंडे,राहुल सुतार,राहुल गवंडी आणि दिग्विजय मोरे यांनी काम पाहिले.

पहिली ते तिसरी, चौथी ते पाचवी, सहावी ते सातवी,आठवी ते दहावी,मूकबधिर पहिली ते चौथी व मतिमंद अशा सहा स्वतंत्र गटात या स्पर्धा झाल्या. 

केंद्रनिहाय व गटनिहाय विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत -

कागल केंद्र - 

गट क्रमांक - १ 

अर्जित कांबळे (बामणी),सायली चव्हाण (पंचलक्ष्मी सिद्धनेर्ली), रिद्धी आंबी(ब्लोमिंग बर्डस्),देवांशी बढे( जयसिंगराव घाटगे कागल), आरोही माने (पंचलक्ष्मी सिद्धनेर्ली).

गट क्रमांक - २ 

अमृता निकम (जयसिंगराव घाटगे कागल), प्रतीक्षा शिंदे( शाहू कागल ),अर्जुन पाटील (होलिडेन कागल),गणेश मगदूम (जयसिंगराव घाटगे कागल),ओवी चौगुले (होलिडेन कागल).

 गट क्रमांक - ३ 

वेदिका वाईंगडे,तनया मगदूम,आराध्या निकम, अधिराज चव्हाण,जान्हवी चव्हाण (सर्व जयसिंगराव घाटगे कागल), समीक्षा डेळेकर (जवाहर कागल).

 गट क्रमांक - ४

सोनाक्षी माने (जयसिंगराव घाटगे कागल), सोहम कांबळे( दूधगंगा कागल),कर्तव्य कुराडे (शाहू कागल), तनुजा चौगुले( जयसिंगराव घाटगे  कागल), वीर पाटील (होलिडेन कागल), स्वरा कणसे( जयसिंगराव घाटगे  कागल).

गट क्रमांक - ५ 

प्रणव पुजारी,समीर सोनुले,जय कांबळे, रामचंद्र बाजार,असीम सय्यद (सर्व कर्णबधिर विद्यालय कागल).

गट क्रमांक - ६ 

आर्यन कुंभार,कार्तिक गुंडप्पीकर, वेदांत पाटील, ऋत्विक यादव, समर्थ नायर( सर्व स्व.गणपतराव गाताडे विद्यालय कागल).

मुरगूड केंद्र - 

गट क्रमांक - १ 

विराज सूर्यवंशी( एम.जे. मुरगुड), भानुप्रसाद साळोखे (जीवन मुरगुड), श्राव्या मुसळे (कन्या मुरगूड), आरोही नलवडे (एम.जे. मुरगुड),शिवांश लोहार( गुरुकुलम मुरगूड ).

गट क्रमांक - २ 

सागर इंदलकर (चौंडेश्वरी हळदी), दूर्वा देवळे,अर्णव आमले( दोघेही मुरगुड विद्यालय),स्पर्श चौगुले ( बिद्री),ऋग्वेद भराडे (दौलतवाडी).

गट क्रमांक - ३ 

विद्याश्री पवार , अंकिता पाटील (दोघीही केनवडे), सहर्ष शिंदे (मंडलिक मुरगूड ),स्वरा गोधडे (शिवराज मुरगूड), श्रावणी पावले (कुरणी).

गट क्रमांक - ४

 श्रुतिका सुतार, विवेक जाधव (दोघेही शिवराज मुरगूड), संग्राम तिकोडे, स्वरांजली रामाने( दोघेही मुरगुड विद्यालय), शुभम मांडवकर (दूध साखर बिद्री).

कापशी केंद्र - 

गट क्रमांक - १ 

अथर्व पाटील,आराध्या लोंढे (दोघेही बोटे  कापशी),वेदिका खराडे(वि.मं. कापशी), शौर्य नाईक,रुद्र लोंढे (दोघेही बोटे कापशी).

गट क्रमांक - २ 

पूर्वा इंगळे (दोशी अर्जुननगर), प्रभात गुरव( न्यू इंग्लिश मुगळी), मनस्वी पाटील(दोशी अर्जुननगर),मोहम्मद मुजावर (शहा निपाणी),आरोही शिंदे (दोशी अर्जुननगर).

गट क्रमांक - ३ 

समृद्धी मोरे (बाळेघोल), श्रीया पाटील( राणी विजयादेवी कापशी), ऐश्वर्या म्हाकवेकर( न्यू इंग्लिश मुगळी), विद्या माने (महालक्ष्मी  लिंगनूर ),योगीराज लुगडे (न्या. रानडे कापशी), श्रीधर कुंभार (राणी विजयादेवी कापशी).

गट क्रमांक - ४ 

कबीर लाटवडे (आनंद सरवडे), मयूर भोसले,आदिती जाधव,पवन वारके, विनया लाठवडे( सर्व दोशी अर्जुननगर).

गट क्रमांक - ५ 

अर्णव दिवटणकर( वडगाव  कापशी)

कणेरी केंद्र - 

गट क्रमांक - १

शिवम चोथे (काडसिद्धेश्वर कणेरी), दिव्यांका पाटील (आंबुबाई पाटील गो. शिरगाव), निरजा आपटे (काडसिद्धेश्वर कणेरी), तनिष्क गुरव,ऋतुराज पाटील (दोघेही आंबुबाई पाटील गो. शिरगाव),आरोशी गोसावी (समर्थ उचगाव).

गट क्रमांक - २ 

कीर्ती पाटील (ज्योतिर्लिंग कोल्हापूर), जान्हवी चव्हाण (आंबुबाई पाटील गो. शिरगाव ),आन्वी आरबोले (काडसिद्धेश्वर कणेरी), अनुष्का कुंभार (नागाव), रागिनी भंडारे( उचगांव )

 गट क्रमांक - ३ 

श्रेणिक सुतार (वाशी), ध्रुविका हेब्बाळे(पाटील कंदलगाव), नेहा प्रजापती(नेर्ली),प्रेम स्वामी (कणेरी), साक्षी मोरबाळे(पाटील कंदलगाव),अफसाना आलम( गोकुळ शिरगाव).

गट क्रमांक - ४ 

मनस्वी बारड(उचगांव), श्रेया माळी( काडसिद्धेश्वर कणेरी), मुग्धा सावंत(उचगांव),अभय यादव (शिरोली पुलाची), सलोनी साह(नेर्ली), आदिती मडिवाळ (उचगाव)