जेष्ठ नागरिकांचा जीवन गौरव सन्मान म्हणजे त्यांना नवसंजीवनी : माजी खा.निवेदिता माने

जेष्ठ नागरिकांचा  जीवन गौरव सन्मान म्हणजे त्यांना नवसंजीवनी  :  माजी खा.निवेदिता माने

कोल्हापूर : घरातील जेष्ठ व्यक्ती या आपल्या कुटुंबासाठी नेहमीच प्रेरणादायी आहे.स्वतःच्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन आपल्या मुलांना शिक्षण, आरोग्य आणि जीवनातील सुख समाधानाचे आयुष्य घडवितात. यासाठी आपली जबाबदारी आहे की त्यांच्या चेहर्‍यावर हसू, आनंद कधीच कमी झाला नसला पाहिजे. त्यांची आरोग्याची काळजी,  त्यांचा औषधोपचार,कुटुंबातील लहान मूलापासून  ते मोठ्या माणसापर्यंत आदर, प्रेम आणि सन्मान देणे आवश्यक आहे. पोलिस मित्र असोसिएशन व वेध फौंडेशन यांनी केलेला  जेष्ठ नागरिकांचा  जीवन गौरव सन्मान म्हणजे त्यांना नवसंजीवनी  आहे, असे प्रतिपादन माजी खासदार निवेदिता माने यांनी केले. 

इचलकरंजी येथे जेष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडविण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेल्या जेष्ठ नागरिक, 11 जेष्ठ दाम्पत्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम इचलकरंजी येथील रोटरी क्लब हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता.

यावेळी माजी खासदार डॉ निवेदिता माने , लेखक संदीप राक्षे, आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.  भाग्यरेखा पाटील, स्वामी समर्थ पेट्रोलियमच्या ऑनर अनिता गभाले, सामाजिक कार्यकर्ते शीतल बिडकर, जेष्ठ नागरिक संघाचे सहसचिव प्रा. अण्णासाहेब क्वाणे यांच्या हस्ते श्रावणबाळ, स्वर्गीय शिवराम निवळेकर व  निर्मला निवळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना दोन्ही संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला व जेष्ठ नागरिक जीवन गौरव सोहळ्याचा उद्देश स्पष्ट केला.

यावेळी बोलताना माजी खासदार माने म्हणाल्या, आपल्या हातातील गोष्टी आपणच केल्या पाहिजेत त्यासाठी कुटुंबावर अवलंबून रहायची गरज नाही.ज्यावेळी मुले मोठी होतात लग्न झाल्यानंतर त्यांना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती कष्टाने घडवले आहे. आपल कर्तव्य आहे की आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे, त्यांचे सुख दुःख काय आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. काही ठिकाणी जर आपल्याला दुर्लक्षित केले जात असेल तर आपला आधार आपणच झाले पाहिजे.पोलिस मित्र असोसिएशन आणि वेध फौंडेशन या दोन्ही संस्थेचे करावे तितके कौतुक कमीच आहे की त्यांनी आज समाजात आणि कुटुंबात जेष्ठ नागरिकांना दुर्लक्षित केले जाते त्यांच्या संघर्षाची दखल घेतली जात नाही अशा सर्वांचा सन्मान करून त्यांच्यात एक नवचैतन्य निर्माण केले आहे. माझी आई एक वर्षापुर्वी गेली नाही तर आई वडिलांना सोबत कार्यक्रमाला आणून मीही त्यांचा गौरव केला असता असे भावनिक उद्गार काढताना माने यांना अश्रू आवरले नाही.  

यावेळी  असोसिएशनचे  राज्य संपर्कप्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, असोसिएशन महिला जिल्हा उपाध्यक्ष सुषमा चव्हाण, शहर अध्यक्ष आशा वाघिरे, उपाध्यक्ष सरस्वती हजारे, आदी पदाधिकारी ,सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाचे आभार डॉ रजनी शिंदे यांनी मानले तर सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले.