HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शिवाजी विद्यापीठाकडून ६५ ‘स्टार्ट-अप’ ना प्रोत्साहन - डॉ. सागर डेळेकर

शिवाजी विद्यापीठाकडून ६५ ‘स्टार्ट-अप’ ना प्रोत्साहन - डॉ. सागर डेळेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) -  शिवाजी विद्यापीठाच्या ‘एसयुके रिसर्च अँड फौंडेशन’ या इनक्युबेशन सेंटर मध्ये शेती, संगणक, रसायन, आरोग्य, पर्यावरण, अन्नप्रक्रिया इत्यादींमधील ६५ स्टार्टअप उद्योगांना बळ देण्यात येत असून या माध्यमातून नवउद्योगांना- विविध वित्त संस्थांकडून बीज भांडवलही देण्यात आले आहे. स्टार्ट-अप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी आता मंथली इनोव्हेशन चॅलेंजद्वारे ही संधी चालून आली असल्याची माहिती संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी दिली.

डॉ. डेळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये विद्यार्थी, संशोधक व नागरिकांना समाजातील विविध समस्यांवर नाविन्यपूर्ण उत्तरे व समाधान सुचविण्याची संधी ''मंथली इनोव्हेशन चॅलेंज'' या उपक्रमातून देण्यात आली. नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यावरील उद्योग याबाबत केंद्रातून नवयुवकांना उद्योजकतेच्या संधीही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या निवड झालेल्या स्टार्टअप्सना महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र राज्य, स्टार्टअप इंडिया, केंद्र सरकार, एमएसएमई, सारथी यांसह इतर शासकीय व खाजगी संस्थांकडून बीज भांडवल मिळण्याची संधी आहे. तरी, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी आपल्या कल्पना १५ जून २०२५ पर्यंत विद्यापीठाच्या वेबसाईटवर न्यूज अँड इव्हेंटस् या विभागात जाऊन गुगल फॉर्ममध्ये भराव्यात व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. डेळेकर यांनी केले. 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.