शिवाजी विद्यापीठाच्या वतीने नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर विद्यार्थी विकास विभाग आयोजित नेतृत्व विकास शिबिर 2025 बहाई अकॅडमी, पाचगणी या ठिकाणी दि. 5 फेब्रुवारी, 2025 रोजी सुरू झाले. नेतृत्व विकास शिबिराचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये हातभार लावण्यासाठी या शिबिराचे आयोजन विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी करण्यात येते. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांमधून तसेच शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधि विभागातून 82 विद्यार्थी या शिबिरात सहभागी झाले आहेत.


विद्यार्थ्यांना त्यांच्यातील सुप्त गुणांची जाणीव करून देण्यासाठी तसेच काल सुसंगत बाबींच्या परिचय करून देण्यासाठी शिबिरामध्ये अनेक मान्यवर व तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले आहेत. व्याख्यानं बरोबरच कृती कार्यक्रम तसेच बहाई अकॅडमीच्या वतीने हॅप्पी हिप्पो शोचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम यांनी शिबिराची सुरुवात होते. उद्घाटन प्रसंगी बहाई अकॅडमीचे संचालक डॉ. लेसन आजादी, विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक, डॉ. टी एम चौगले शिबिराचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने तसेच विद्यार्थी विकास विभागाचा सर्व स्टाफ उपस्थित होता. शिबिराची सांगता दिनांक 7 फेब्रुवारी, 2025 रोजी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.