HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

शरद इन्स्टिट्युटने स्वत:चा पॅटर्न निर्माण केला : विवेक वेलणकर

शरद इन्स्टिट्युटने स्वत:चा पॅटर्न निर्माण केला : विवेक वेलणकर

यड्राव - यड्राव ‘विद्यार्थ्यांनी आपली स्वत:ची क्षमता ओळखून व आत्मपरिक्षण करुन करिअरचा मार्ग निवडावा. त्यामधून रोजगार, स्वयंरोजगार, व्यवसाय निर्माण होणे आवश्यक आहे. आपण कोणते कौशल्य आत्मसात करायला हवे याची माहिती करुन घ्यायला हवी. देशात काही राष्ट्रीय स्तरावरील इन्स्टिट्युट स्वत:चे पॅटर्न निर्माण केले आहेत. तसे इंटर्नशीप, प्रोजेक्ट, प्रॅक्टीकलसह विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक उपक्रम राबवून स्वत:चा “शरद पॅटर्न” निर्माण करणारे म्हणजे शरद इन्स्टिट्युट आहे. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासह संस्कारमय शिक्षण शरदमध्ये मिळतेय.’ असे प्रतिपादन जेष्ठ करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांनी केले. 

ते शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शन परिसंवादात बोलत होते. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील प्रमुख पाव्हण्या होत्या. संस्थेचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे प्रमुख उपस्थित होते. 

वेलणकर पुढे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी आपण कोणत्या विभागाला जायचे आहे, त्यासाठीच्या कोणत्या पात्रता परिक्षा आहेत हे माहित आसणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी जगभरात कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठीच्या पात्रता परिक्षा, महाविद्यालये यांची माहिती दिली.’

यावेळी पाटील म्हणाल्या, ‘प्रत्येकाने आपला आतला आवाज ऐका, आवड काय आहे हे समजून घ्या. कोणतेही क्षेत्र निवडा त्यामधील समर्पण महत्वाचे आहे. प्रचंड मेहनत, आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिक प्रयत्न व वेळेचे व्यवस्थापन हे केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल.’ 

बागणे म्हणाले, ‘यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट नाही. कष्ट आणि तेही सातत्याने करायला हवे. तर यश नक्की मिळेल. शरद इन्स्टिट्युट हे फक्त शिक्षण देणारी संस्था नसून संस्काराचे मंदिर आहे.’ प्रा. ए. बी. जाधव यांनी सर्व विभागासाठी लागणारी कागदपत्रे, शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रिया याची माहिती दिली.

यावेळी प्राचार्य बी.एस. ताशीलदार, डिन, विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.