HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) - डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधील एमबीए व एमसीएच्या ४१ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळाले आहे. विविध कंपनीकडून घेण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून ही निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना वार्षिक सर्वाधिक ७.२५ लाखापर्यंत पॅकेज मिळाले आहे.

यामध्ये जस्ट डायल कंपनीमध्ये ९ विद्यार्थ्यांची तर लोकल मार्टमध्ये १० जणांची निवड झाली आहे.  डी मार्ट या नामांकित साखळी संस्थेत ३ विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले असून मनोरमा सोल्युशन्स या नामांकित आयटी सोल्युशन कंपनीत ४ विद्यार्थ्यांची, थरमॅक्स ह्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेत २ विद्यार्थ्यांची, सिलेक्शन झाले आहे ॲक्सिस बँक, कॅलिक्स सोल्युशन, राज इम्पोर्ट, सॉफ्टवेंजर, बजाज फिनसर्व या कंपनीमध्येही विविध विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

संचालक डॉ. अजित पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, या यशामागे प्लेसमेंट सेलचे नियोजन, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची मेहनत यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेली गुणवत्ता आणि आत्मविश्वास हे त्यांच्या यशाचे गमक आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. येत्या काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या संधी मिळवून दिल्या जातील. 

निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्याचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.