50 लिटर दूधसंकलन करणाऱ्या संस्था बंदचं करा
कोल्हापूर प्रतिनिधी :-
कोल्हापूर जिल्ह्यातील 1450 दूधसंकलन करण्याऱ्या संस्थाना दुग्धविभागाने नोटीसा पाठवत 50 लिटर दूधसंकलन करणाऱ्या संस्थाना संस्था बंदचं कराव्यात तसेच संस्थांची नोंदणी एका संघाकडे तर दूध मात्र दुसऱ्याचं संघाला, अशा संस्थांचा यात समावेश करत संकलनात गोंधळ दिसत असलेल्या संस्थांना अवसायनाची कारवाई सुरु केली आहे. काही संस्था संघाचे सभासद कायम ठेवण्यासाठी 10 ते 20 लिटर दूध पुरवठा करून बाकीचे दुध इतर संघांना पुरवतात, अशा संस्थांनाही नोटीस मिळाली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांनी दूध आणि दुग्ध विभागाच्या कामकाजाची तपासणी सुरू करत 50 लिटर दूध संकलन करणाऱ्या संस्था बंदच करा, असे आदेश काढले आहेत. जर कार्यवाही झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
कोल्हापूर जिल्ह्यात 6 हजारांपर्यंत दूध संस्था आहेत. यातील 2 हजार संस्थांमध्ये 50 ते 70 लिटरच दूध संकलन होत आहे. अश्या संस्था निकाली काढण्यासाठी दुग्ध विभागाचे तीन वर्षांपासून प्रयत्न सुरु होते, अखेर दूधविभागाच्या कमी संकलन व बंद असणाऱ्या 1450 दूध संस्था अवसायनात काढण्याच्या प्रक्रियेला सुरवात झालेली पाहायला मिळत आहे.