बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 91.25 टक्के*
कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा बारावीचा निकाल 91.35 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना दुपारी दोन वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा पाच टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 93.73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या असून मुलांच्या निकालाची टक्कवारी 89.14 टक्के आहे.
राज्यात एकूण 14,16,371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 12,92,468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. म्हणजे राज्याचा निकाल 91.25 टक्के आहे.
पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या (रिपीटर) निकालाची टक्केवारी- 44.33 टक्के
खाजगी विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी- 82.39 टक्के
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी- 93.43 टक्के आहे.
विभागनिहाय निकाल*
कोकण : 96.01
पुणे : 93.34
कोल्हापूर : 93.28
अमरावती : 92.75
औरंगाबाद : 91.85
नाशिक : 91.66
लातूर : 90.37
नागपूर : 90.35
मुंबई : 88.13