शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करा- जिल्हाधिकारी अमोल येडगे
कोल्हापूर (प्रतिनिधि) : आत्मा योजनेच्या माध्यमातून कृषी विद्यापीठामार्फत विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून गरजेनुसार शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्या.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजनेची नियामक मंडळाची त्रैमासिक सभा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय झाली. या सभेस विविध शासकीय विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी बैठकीत आत्मा योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण अभ्यास दौरे शेतीशाळा किसान गोष्टी प्रचार प्रसिद्धीसाठी कृषी मेळावे जिल्हा कृषी महोत्सव व स्मार्ट योजना याविषयी आढावा घेतला. जिल्ह्यातील उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच सन २०२४-२५ मध्ये कृषी विस्तार विषयक राबवण्यात येणाऱ्या विविध योजना विषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.