श्री गणेशमूर्तीकारांना शाडूमाती व जागा उपलब्ध करुन द्यावे
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पारंपारिक कुंभार समाजाच्या गणेशमूर्तीकारांना शासनाच्या धोरणानुार पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करणेचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार कुंभार समाजातील पर्यावरण पुरक शाडू मातीच्या गणेशमुर्ती बनवणारे पारंपारिक कारागीर या मूर्ती बनवत आहेत. सदरच्या गणेशमुर्ती तयार करणेसाठी शाडूमाती व जागेची उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. शासनाच्या धोरणानुसार शाडूमाती (मोफत) तसेच माफक दरात आवश्यक असणारी जागेची उपलब्धता करुन द्यावे. अशा मागणीचे निवेदन संत गोरोबा कुंभार शाडूमाती मुर्तीकार संघटनेच्या वतीन माननिय आयुक्त यांना देण्यात आले.