नरेंद्र मोदींचे भाषण चर्चेत; एनडीएला मिळालेलं यश अभूतपूर्व
आज लोकसभेचे नेते, भाजपाचे नेते आणि एनडीचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासह सगळ्याच घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं. एनडीएला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे असं पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. २०१९ मध्ये मी जेव्हा याच सदनात मी बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं विश्वास. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे.