HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

पालकमंत्री आणि नियोजन मंडळास शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाचे वावडे आहे का ?

पालकमंत्री आणि नियोजन मंडळास शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाचे वावडे आहे का ?

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात शासकीय विकास योजनांच्या कोट्यवधी रुपयांच्या घोषणांचा पाऊस पडत आहे, ही बाब स्वागतार्थ आहे. पण सन 1993 सालापासून कोल्हापुरात सुरु असलेल्या शासकीय छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाचे पालकमंत्री आणि नियोजन मंडळास वावडे आहे का? असा सवाल कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूर आणि समस्त क्रीडा प्रेमी कोल्हापूरकर यांच्या वतीनं पत्रकाद्वारे विचारलाय.

या पत्रकात पुढ त्यांनी म्हटलंय, “छत्रपती शिवाजी स्टेडियम जलतरण तलावाच्या नजीकच्या स्टेडियम ग्राउंड साठी दीड दोन कोटी रुपयांचा निधी मेंटनन्स साठी आणला, पण या जलतरण तलावासाठी फक्त 75 ते 80 लाखाचा निधी देता येत नाही म्हणजे पालकमंत्री व राज्य नियोजन मंडळास या जलतरण तलावाचे वावडे आहे काय? याचे कारण समजत नाही. या तलावात सराव करून कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुले-मुली खेळाडूंंनी राज्यांचे व देशाचे नावलौकिक वाढवला. अशा या तलावाच्या नूतनीकरणासाठी किंवा पुनर्रचना करण्याकरिता जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध का केला जात नाही? या तलावासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देऊन कोल्हापूरच्या जलतरण खेळातील वैभवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करावं.” 

रमेश मोरे, अशोक पोवार, उमेश कडोलीकर, समीर चौगुले, अभिजीत कपडेकर, निलेश जाधव, प्रकाश आमते, राजाभाऊ मालेकर, लहुजी शिंदे, महादेवराव जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, स्विमिंग हब फाउंडेशन कोल्हापूर आणि समस्त क्रीडा प्रेमी कोल्हापूरकर यांनी हे पत्रक काढलंय.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.