श्री राजे संभाजी मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले शाळेत प्युरिफायर आणि शैक्षणिक साहित्य वाटप
कोल्हापूर (प्रतिनिधी)
श्री राजे संभाजी तरुण मंडळाच्या वतीने यंदा गणेश उत्सवाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कन्या शाळा (कोल्हापूर महानगरपालिका) यांना प्युरिफायर पाणी शुद्ध करण्याची मशीन तसेच विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.
हा कार्यक्रम श्री राजे संभाजी मंडळ येथील हॉलमध्ये पार पडला. शैक्षणिक साहित्य व पुरिफायर पाणी शुद्धीकरणाचे यंत्र अजित मोरे , साई समर्थ ज्वेलर्स अँड रिफायनरी चे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व सामाजिक युवा कार्यकर्ते ,विहार चौगुले यांच्या सहकार्यातून शाळेला भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार जयश्री जाधव होत्या. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास जाधव यांनी केले . मंडळाच्या सामाजिक कार्याची त्यांनी माहिती दिली.
श्री राजेश संभाजी तरुण मंडळाच्या वतीने संकल्प विधायक गणेशोत्सवाचा या उपक्रमाद्वारे 22 वर्षे विविध कार्यक्रमाने साजरा केला जातो.या मंडळाने 1987 सालापासून प्रबोधनात्मक देखावे, पूरग्रस्तांना मदत ,पहिले भारताचे ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या स्मृतिदिन निमित्त विशेष कार्यक्रम, राबवले जातात.
यावेळी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी अथर्वशीर्ष पठण केले याप्रसंगी विद्या चौगुले, माधुरी चव्हाण ,मेघा विलास जाधव, सुचित्रा सरनाईक इत्यादी महिला उपस्थित होत्या.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक जोंग ,अजित कानकेकर, शंकर साळुंखे ,मनोज शिंदे तसेच सामाजिक कार्यकर्ते बबन मोरे, सतीश कुसुंबे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन गणेशोत्सव समितीचे कार्यकर्ते सुरज पवार, दिग्विजय चव्हाण ,कपिल सरनाईक ,यांच्या माध्यमातून केले होते.