HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा कोजीमाशी वार्षिक सभेत ठराव

सेवानिवृत्तांना सभासद करण्याचा कोजीमाशी वार्षिक सभेत ठराव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या (कोजिमाशिच्या) -५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अ वर्ग सभासद करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. सभासद कर्ज मर्यादा ४२ वरून ४७ लाख रुपये व दोन लाख रुपये तातडीच्या कर्जास १० ऐवजी ९ टक्के व्याजदर करण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष मदन निकम यांनी केली. महासैनिक दरबार हॉल येथे अडीच तास खेळीमेळीच्या वातावरणात सभा झाली.

सभासदांना १९ टक्के लाभांश देणे, स्टाफिंग पेंटर्नला मंजुरी देणे, मुरगूड शाखा इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास मंजुरी, आदी सभेपुढील विषय बहुमताने मंजूर करण्यात आले.

तज्ञ्ज्ञसंचालक दादा लाड म्हणाले, 'संस्थेने सहाशे कोटी रुपये ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. चालू आर्थिक वर्षात ४ कोटी ८७ लाख रुपये नफा झाला. संस्थेने २२८ कोटी २ लाख रुपये गुंतवणूक केली आहे.' संस्थेने स्वमालकीच्या वास्तूत सर्व शाखा उभ्या करण्याची मागणी सुहास पाटील यांनी केली. दीपक साठे यांनी संस्थेने अॅप तयार करून घरबसल्या खात्याची माहिती देण्याची मागणी केली. विनोद उत्तेकर यांनी बांबवडे व कोवाड

शाखेबाबत प्रश्न उपस्थित केले. शिवाजी नाईक, पवन पाटील, अशोक मानकर, अंकुश कांबळे, अमरसिंह रजपूत यांनी प्रश्न विचारले. संचालक उत्तम पाटील, लक्ष्मण डेळेकर, अनिल चव्हाण, दत्तात्रय घुगरे, राजेंद्र रानमाळे, प्रकाश कोकाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते. अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले, उपाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी आभार मानले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.