HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

जयसिंगपूर (प्रतिनिधी) :  श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात 15 सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

 

  सभेचे संयोजन संस्थेचे मानद सेक्रेटरी किरण कापसे व खजिनदार सूर्यकांत बदामी यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष अनिल इनामदार यांनी केले.यावेळी त्यांनी संस्थेचा वार्षिक आढावा सादर केला. तसेच नियोजित संकल्पनांचा आढावा घेतला. त्यामध्ये संस्थेच्या आवारातील वृक्षारोपण, शुद्ध पिण्याचे पाणी, क्रीडांगणाचा विकास, चिल्ड्रन पार्क, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम करणे संदर्भात इच्छा व्यक्त केली.

  यापैकी संस्थेच्या आवारात 160 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्यासाठी संजय घोडावत युनिव्हर्सिटीने ‘५० ट्री गार्ड' दिले आहे. याबद्दल उपस्थित विद्यापीठाचे विश्वस्त व सदस्य विनायक भोसले यांचे आभार मानण्यात आले.

  या सभेत नऊ ठराव मांडण्यात आले. जे बहुमताने मंजूर करण्यात आले. सिद्धिविनायक  गृहनिर्माण संस्थेकडे  उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा उपयोग सोसायटीच्या हितासाठी व विकासासाठी व्हावा यासाठी भविष्यातील योजनांची आखणी केली जाईल असे सर्वानुमते ठरले.

   यावेळी संस्थापक सदस्य डॉ. श्रीमती पुष्पलता इनामदार उपस्थित होत्या. तसेच सर्व सदस्य उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुधीर कुलकर्णी यांनी केले.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.